गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयास कुलर भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयास कुलर भेट

राहूरी फॅक्टरी(वेबटीम)  राहूरी तालुक्यातील गुहा येथील गँगाधर बाबा छात्रालयास  युवाधार ग्रुप फाऊंडेनच्यावतीने अहमदनगर मनपाचे नगरसेवक स्वप्नील...

राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

 राहूरी तालुक्यातील गुहा येथील गँगाधर बाबा छात्रालयास  युवाधार ग्रुप फाऊंडेनच्यावतीने अहमदनगर मनपाचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १९ मार्च रोजी कुलर भेट देण्यात आले.

राहूरी फॅक्टरी व परिसरात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवाधार ग्रुप फाउंडेशनच्यावतीने नेहमी सामाजिक उपक्रम राबविले जाते.

शुक्रवार १९ मार्च रोजी अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक स्वप्निल शिंदे यांचा वाढदिवस गुहा येथील गंगाधर बाबा छत्रालयातील लहान मुलांच्या सानिध्यात साजरा करण्यात आला. यावेळी गंगाधर बाबा छात्रालयातील मुलांसाठी कुलर भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.

 यावेळी नगरसेवक स्वप्नील शिंदे, नरेंद्र चव्हाण,  सुधीर पठारे, प्रसाद कदम, तुषार कदम, सचिन कदम, योगेश राऊत, सतीश औटी, छात्रालयाचे व्यवस्थापक पप्पू सपकाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत