जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करणार का? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करणार का?

देवळाली प्रवरा(वेबटीम)         कोरोना रूग्ण संख्या दिवसागणिक वाढतच असताना देवळाली प्रवरा नगरपालिका विनामास्क फिरणाऱ्यां नागरिकांवर कुठलीही क...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

        कोरोना रूग्ण संख्या दिवसागणिक वाढतच असताना देवळाली प्रवरा नगरपालिका विनामास्क फिरणाऱ्यां नागरिकांवर कुठलीही कारवाई करत नाही.जिल्हाधिकारी येताच कारवाईचा देखावा  नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केला. आता तर जिल्हाधिकारी यांनी कोरोना पार्श्वभूमीवर ज्या आस्थापना सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनेटायझर आदी गोष्टींचा अवलंब करणार नाही, त्या आस्थापना ७ दिवस बंद करण्याचे अधिकार नगरपरिषदेला दिले असून आता देवळाली प्रवरा नगरपालिका या आदेशाचे पालन करुन अधिकाराचा वापर करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

   अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे. देवळाली प्रवरा परिसरात कोरोना रूग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. दुकानदार, व्यापारी विनामास्क, सॅनेटायझर आदी गोष्टींचा वापर व पालन करताना दिसत नाही.असंख्य दुकानात मोठी गर्दी दररोज बघावयास मिळते. बाजारतळ परिसरात सकाळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्यने हजर असतात. मास्क न लावता गप्पा- छप्पा हा कार्यक्रम नियमित सुरू असतो. नगरपालिका याबाबत कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. 

         दर शनिवार भरणाऱ्या आठवडे बाजारात मोठ्या संख्यने नागरिकांची गर्दी असते. व्यापारी, शेतकरी व नागरिक कसलेही बंधन न पाळता खुलेआम फिरत असतात. नगरपालिकेने बाजार दिवशी फिरते पथक तयार करून दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असताना याकडे पूर्णपणे कानाडोळा केला जातो. 

मुख्याधिकारी अजित निकत यांनी कोरोना पार्श्वभूमीवर उपाययोजना संदर्भात गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही नियोजन करणे आवश्यक असताना तसे यंदा होताना पहावयास मिळत नाही. मुख्याधिकारी हे कार्यालयीन अधिक्षक  यांचेच ऐकत असतात , ते म्हणतील ती पूर्वदिशा याप्रमाणे नगरपालिकेत कारभार सुरू आहे. कार्यालयीन अधिक्षक यांची नगरपालिकेत जास्तच लुडबुड वाढली असल्याने नगरपालिका कर्मचारी पुर्णपणे वैतागले आहेत. जेवढं जमेल तेवढं काम करायचं, जास्त टेन्शन घ्यायच नाही, याप्रमाणे कर्मचाऱ्यांचे काम सुरू आहे. परिणामी कोविड नियंत्रण  उपाययोजना करण्यासाठी पालिका प्रशासन ढिम्म झाले असल्याचे चित्र देवळाली प्रवरात पहावयास मिळत आहे.

 मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.भोसले देवळाली प्रवरा शहरात  येणार असे समजताच नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी शहरातील सर्कल जवळ थांबून विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा देखावा करुन अवघ्या 7 नागरिकांकडून दंड वसुल करुन कारवाई केल्याचे कागदी घोडे नाचविले आहे.  जिल्हाधिकारी  साहेब देवळालीतून बाहेर पडत नाही तोच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी विना मास्क दंड वसुलीचा गाशा गुंडाळला.

 काल दुपारी तर देवळाली प्रवरा बाजार तळावर परराज्यातील पोटभरु कलाकार मंडळींची संगीत मैफिल रंगली होती. ही मैफिल ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी होती तर अनेक नागरिक विनामास्क बाजार तळावर यावेळी पहावयास मिळाले. त्यावेळी जिल्हाधिकारी आल्यानंतर दिखावा करणारे विनामास्क दंड वसुली करणारे पथक कुठे गायब झाले होते. असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.

 दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ज्या आस्थापना सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनेटायझर आदी गोष्टींचा अवलंब करणार नाही अशा सर्व आस्थापना ७ दिवस बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील तहसिलदार व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनाअधिकार दिले आहे. आता या आदेशाचे व अधिकाराचे देवळाली प्रवरा नगरपालिका मुख्याधिकारी पालन करणार का? येत्या काळात पहावयास मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत