कोपरगाव प्रतिनिधी वाढत्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील टाकळी गावांमध्ये covid-19 संदर्भात मिटिंग आयोजित केली होती मिटिंग मध्ये मार...
कोपरगाव प्रतिनिधी
वाढत्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील टाकळी गावांमध्ये covid-19 संदर्भात मिटिंग आयोजित केली होती मिटिंग मध्ये मार्गदर्शन करताना कोपरगाव शहराचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी देसले यांनी टाकळी गावांमध्ये जो कोणी मास्क वापरणार नाही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा किंवा न ऐकल्यास आमच्यापर्यंत त्यांचे नाव कळवा आम्ही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून कायम सांगून गावात ची टोळके बसत असेल ती ऐकत नसेल त्यांच्या वर सुद्धा आम्ही कारवाई करू त्यांची नाव आम्हाला कळवा आपल्या गावचा संरक्षण साठी स्वतः स्वतः गावकऱ्यांनीच स्वतःची काळजी घेतली पाहिजे गावाची त्याच कुटुंबाची काळजी घ्या काही अडचण असेल तर आमच्याशी संपर्क साधा तलाठी भाऊसाहेब ग्रामसेवक पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य अशी एक कमिटी तयार करून त्यांच्यात त्यांनी सकाळी नऊ ते पाच नंतर जे कोणी विना मास्क वाले टोळके करून एकत्रित बसणारे दिसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा आणि आपल्या गाव सुरक्षित ठेवून आपल्या गावच्या बाहेर तालुक्याच्या बाहेर शक्यतो कामाव्यतिरिक्त कोणीही कुठे जाऊ नये अशी गावात दवंडी द्या आणि आपलं परिवार सुरक्षित रहा शासनाचे नियम पाळा ज्या काही अडचणी असेल त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा.
यावेळी सोपानराव देवकर यांनी आभार मानले तर माजी सभापती सुनील देवकर यांनी पोलिस निरीक्षक देसले यांचा सत्कार केला.
यावेळी माजी सभापती सुनील देवकर, उपसरपंच संजय देवकर, पोलीस पाटील राजेंद्र देवकर, ज्येष्ठ नेते सोपानराव देवकर, सुनील पाईक, ग्रामपंचायत सदस्य गणेश पळसकर,शशिकांत देवकर, नारायण बर्डे, अशोक देवकर, सुभाषराव देवकर, बाळासाहेब पाईक, अमोल देवकर, बाळासाहेब देवकर आणि ग्रामस्थ सर्व सदस्य ग्रामपंचायत उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत