राहूरी फॅक्टरीत तरुणीचा विनयभंग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरीत तरुणीचा विनयभंग

  देवळाली प्रवरा (प्रतिनिधी )         नगर येथे नोकरीस असलेली तरुणी  राहूरी फॅक्टरी बस स्थानक येथे उतरल्यानंतर आपल्या  घरी जात असताना सदर तरु...

 देवळाली प्रवरा (प्रतिनिधी )

        नगर येथे नोकरीस असलेली तरुणी  राहूरी फॅक्टरी बस स्थानक येथे उतरल्यानंतर आपल्या  घरी जात असताना सदर तरुणीला मद्यपान व गांजाच्या नशेत तल्लीन असेलेल्या तरुणाने मिठी मारुन हाताला चावा घेत विनयभंग केल्याचा प्रकार घडला असताना परिसरातील नागरिकांनी त्या तरुणास चोप दिला असता. विनयभंग करणाऱ्यास चोप का दिला म्हणून भावा विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या असून पोलीसांचे गुन्हेगाराला संरक्षण आहे का? नागरिकांसाठी पोलीस आहे.असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नोकरदार महिला मोठ्या घरातील असल्याने मोठी आर्थिक कमाई होईल या अपेक्षेने पोलीसांनी तरुणीच्या भावा विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याची हालचाली सुरू झाल्याने सदर तरुणीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याशी भ्रमणभाषवर संपर्क साधुन या घटनेची माहिती दिली असल्याचे समजते.

             राहूरी फॅक्टरी येथील सदन भागातील व उच्चभ्रू कुटुंबातील  तरुणी नेहमीप्रमाणे रात्री ८.३० च्या दरम्यान  घराकडे जात असताना अचानकपणे समोरून दारूच्या नशेत व गांजा पिऊन आलेल्या राजेंद्र गणेश पाटोळे याने हात पकडून मिठी मारुन विनयभंग केला. सदर महिलेले प्रतिकार करत आरोडाओरडा करताच शतपावली साठी आलेल्या महिला व नागरिकांनी धावून येत मद्यपी राजेंद्र पाटोळे यास चांगला चोप दिला. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पाटोळेला पोलीस ठाण्यात नेले व त्याच्यावर विनयभंग गुन्हा दाखलही केला.

           दरम्यान त्यानंतर   विनयभंग करणाऱ्या पाटोळे यास तुम्ही मारहाण का केली आहे असा सवाल पोलीसांकडून केला गेला. पाटोळे यास मारहाण करणाऱ्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करावा लागलं अशी भूमिका पोलिसांनी घेतली.   चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार सध्या राहुरी पोलीस स्टेशनमध्ये घडत आहे. गुन्हेगारी कमी दाखविण्यासाठी की? नोकरदार व उच्चभ्रू कुटुंबातील तरुणीकडून मोठी आर्थिक कमाई होईल? या आशेने पोलीस विनयभंग पिडीत तरुणीच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करीत आहे, हा संशोधनाचा प्रश्न आहे. राहुरी पोलीस ठाण्यात तक्रारदारास सहानभुती मिळण्याऐवजी गुन्हेगारास संरक्षण मिळत आहे. यावरुन पोलीसांची भुमिका स्पष्ट होते की जो आर्थिक बाजू भक्कम मांडील त्याचीच बाजू पोलीस घेतील ?

पाटोळे हा विनयभंग केलेल्या तरुणीची व तिच्या कुटुंबाची माफी माघत असतानाही पोलिसांकडून विनयभंग झालेल्या तरुणीच्या भावावर गुन्हा दाखल करण्याचा अट्टाहास का? केवळ सदर कुटुंब उच्चभ्रू व मालदार  पार्टी असल्यामुळे का? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.


विनयभंग करणाऱ्या पाटोळेची आरती करायची का? संतप्त महिलांचा सवाल

        राहुरी कारखाना येथील नोकरीवरुन घरी जात असलेल्या  तरुणीचा विनयभंग करणारा राजेंद्र पाटोळे यास नागरिकांनी चोप दिला असता पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला परंतु नोकरदार व उच्चभ्रू कुटुंबातील तरुणीकडून मोठी आर्थिक तडजोड होईल या आशेने विनयभंग झालेल्या तरुणीच्या भावावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी पोलिसांनी दिली. एक प्रकारे 'चोर सोडून संन्यासाला फाशी' देण्याचा घाट पोलिसांनी घातला असल्याचे बोलले जात असून विनयभंग करणाऱ्या  तरुणाला चोप देण्याऐवजी त्याची आरती करायची का? असा प्रश्न संतप्त  महिलांनी केला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत