आंबी(संदिप पाळंदे) कोरोनाच्या मगरमिठीतुन शेतकरी कुठेतरी सावरायला लागला होता. तोच अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रवरा पट्ट्यातील शेतपिकांचे अतोन...
आंबी(संदिप पाळंदे)
कोरोनाच्या मगरमिठीतुन शेतकरी कुठेतरी सावरायला लागला होता. तोच अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रवरा पट्ट्यातील शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा, मका, काढणीला आलेला गहु, हरभरा आदी पिके भुईसपाट झाली असून फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आहेत. वादळी वाऱ्याने आंबी येथील दोन चारी परिसरातील बाबासाहेब येवले यांच्या राहत्या घरावर लिंबाचे झाड कोसळून स्वयंपाक खोलीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने खोलीत कोणी नसल्याने जिवीतहानी नाही मात्र येवले यांच्या घराचे मोठे नुकसान झाले.
मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यातच अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान सोसावे लागले. शासनाने तुटपुंजी नुकसान भरपाई देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यातून सावरत कर्ज काढून, उधारी उसनवारी करून शेतकऱ्यांनी शेताची मशागत केली. महागडे कांदा बियाणे विकत आणले. पोटाला चिमटा देत कांदा लावणी केली. त्यातच काही बियाणे कंपन्यांनी बनावट बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून गारपिटीने कांदा पातीचा अक्षरशः तुटून पडल्या आहेत.
महसूल, कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना अस्मानी संकटाची नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
"अवकाळी पाऊस व गारपिटीने आंबी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी. याकामी आंबी ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेल."
- सुभाष डुकरे (ग्रामपंचायत सदस्य, आंबी)
"कृषी सहायक अरुण राजभोज यांच्या समवेत नुकसानग्रस्त पिके व घरांचे स्थळ निरीक्षण केले आहे. तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याशी चर्चा करून प्रशासनाच्या आदेशाने पंचनामे करण्याबाबत कार्यवाही करण्याची दक्षता घेतली जाईल."
- रूपेश कारभारी (तलाठी आंबी)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत