साई आदर्श मल्टीस्टेटच्या कर्मचाऱ्यांचे शिबिर उत्साहात संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

साई आदर्श मल्टीस्टेटच्या कर्मचाऱ्यांचे शिबिर उत्साहात संपन्न

राहुरी(वेबटीम) प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवनविन संकल्पना शिकावयास मिळतात म्हणून प्रशिक्षण ही आजच्या काळाची गरज असून त्यामाध्यमातून  नवनवीन ...

राहुरी(वेबटीम)

प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवनविन संकल्पना शिकावयास मिळतात म्हणून प्रशिक्षण ही आजच्या काळाची गरज असून त्यामाध्यमातून  नवनवीन संकल्पना आत्मसात करून आपली संस्था अधिकाधिक कशी पुढे नेता येइल याचेही ज्ञान मिळते असे प्रतिपादन नागेबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन कडूभाऊ काळे यांनी केले आहे.

साई आदर्श मल्टीस्टेटच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर श्री.क्षेत्र ताहाराबाद येथील संत महिपती महाराज मंंदिर सभामंडपात  पार पडले. या प्रसंगी ते बोलत होते.

सुरेशराव वाबळे यांनी पतसंस्था चळवळीतील वाटचाली विषयी मार्गदर्शन करून ते पुढे म्हणाले दरवर्षी संस्थेच्या कर्मचारी वर्गास प्रशिक्षण देवून स्पर्धेच्या युगात टिकणे गरजेचे असते आणि याबाबतीत साई आदर्शने पतसंस्था चळवळीत एक नवा पायंडा पाडला आहे .ठेवीदार व कर्जदार हे आपले दैवत आहे व त्यांना तत्परतेने सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे.

       शिबिरास महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश शेठ वाबळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे, व्यंकटेश मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश देहेडकर,लातुरचे सी.ए मोसिन शेख व प्रसिध्द निवेदक प्रा.प्रसाद बेडेकर आदि प्रमुख उपस्थिताचे शिबीरार्थीना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

       यावेळी बोलताना कडूभाऊ काळे हे  पुढे म्हणाले कर्मचाऱ्यांनी कायम शिकत राहिले पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे त्यातून ग्राहकांना नविन सुविधा निर्माण करुण द्याव्यात नवनवीन संकल्पना राबवाव्यात व कायम शिकण्याची वृत्ती ठेवावी. साई आदर्श ने थोड्या दिवसात नावलौकिक केला त्यास चेअरमन शिवाजीराव कपाळे व संचालक मंडळाचे योग्य नियोजन ,कर्मच्यार्यांची साथ असल्याने हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

       शिबिरास संचालक विष्णुपंत गिते, अविनाश साबरे , डॉ. विलास पाटिल , जनरल मँनेजर सचिन खडके व सर्व कर्मचारी वृंद यांनी शिबीरात उपस्थित राहुन लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत