बेपत्ता बहिणींचा २४ तासात शोध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बेपत्ता बहिणींचा २४ तासात शोध

कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरातील रागाच्या भरात  बेपत्ता झालेल्या ३ अल्पवयीन बहिणींचा अवघ्या चौवीस तासांच्या आत रात्र डोक्यावर घेत कोपरगाव शहर...

कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव शहरातील रागाच्या भरात  बेपत्ता झालेल्या ३ अल्पवयीन बहिणींचा अवघ्या चौवीस तासांच्या आत रात्र डोक्यावर घेत कोपरगाव शहर पोलिसांनी शोध लावला असून या तीनही मुलींना रांजणगाव परिसर पुणे  येथून सुखरूप परत आणून या मुलींना सुखरूप त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.  पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

कोपरगाव शहरातील यशवंत चौक कहार गल्ली येथील अल्पवयीन तीन मुली शुक्रवार दिनांक १९ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून  घरातून बेपत्ता झाल्याचे त्यांच्या आई वडिलांना कामा वरून घरी आल्यावर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बेपत्ता झाल्याचे लक्षात आले  घरातील व्यक्तींनी शिर्डी कोपरगाव रेल्वे स्टेशन शहरातील सर्व परिसरात  या तीन मुलींचा शोध सुरू केला मात्र यश आले नाही त्यानंतर घरातील व्यक्तींनी तात्काळ कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली आपल्या तीनही मुली बेपत्ता झाल्याची सर्व हकीकत मुलीच्या आईने पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांना सांगितली पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी क्षणाचा विलंब न करता तीन बहिनींपैकी  मोठ्या बहिणीच्या मोबाईलच्या लोकेशन द्वारे तपास सुरू केला जस जसे लोकेशन मिळत गेले त्या दिशेने त्यांनी तपासाची चक्रे फिरवली या मुली रांजणगाव परिसर पुणे येथे असल्याचे कळताच त्यांनी रात्रीच पुणे येथे जाण्यासाठी  पोलिस कॉन्स्टेबल बाबा कोरेकर यांच्यासह तेथील स्थानिक अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले असता त्या मुली कोरेगाव पार्क येथे मिळून आल्या त्यांना कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस बाबा कोरेकर त्यांचे सहकारी कोरेगाव पोलिस ठाण्यात जाऊन या तीनही मुलींना ताब्यात घेवुन कोपरगाव येथे आणून त्यांच्या आई वडिलांना व मुलींना समज देत आई वडिलांच्या स्वाधिन केले आहे.


पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून या मुलींच्या आई वडिलांनी व स्थानिक रहिवाशांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पो.हे. कॉ. बाबा कोरेकर ,महिला पो.कॉ. मनिषा त्रिभुवन व सर्व सहकाऱ्यांचा सत्कार करत आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत