शेतकऱ्यांसाठी थेट बांधावर पोहचले राज्यमंत्री तनपुरे ! मदतीची ग्वाही - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शेतकऱ्यांसाठी थेट बांधावर पोहचले राज्यमंत्री तनपुरे ! मदतीची ग्वाही

 राहुरी : वेबटीम    राहुरी मतदार संघात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी राज्यमंत्री प्राज...

 राहुरी : वेबटीम   


राहुरी मतदार संघात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली

काल नगर जिल्ह्यातील तीन तालुक्यात सायंकाळी गारपीट व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्यामुळे नियोजित पाथर्डी दौरा रद्द करून नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, मल्हारवाडी, घोरपडवाडी , गाडकवाडी , म्हैसगाव , कोळेवाडी आणि इतर काही गावांमध्ये शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे.  दरम्याान, या नुकसानीचा तात्काळ प्राथमिक अहवाल बनविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. माझ्या शेतकऱ्यांना या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी शासन दरबारी पूर्ण प्रयत्न केले जाईल अशी ग्वाही राज्याचे राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत