कोपरगावातील बेसुमार पाणी वापरणाऱ्यांचा नगराध्यक्षांनीच केला भांडाफोड! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावातील बेसुमार पाणी वापरणाऱ्यांचा नगराध्यक्षांनीच केला भांडाफोड!

कोपरगाव(प्रतिनिधी) कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच कोपरगावचा पाणीप्रश्न तापू लागला आहे. सतत पाणीप्रश्नावरून राळ उठविणारे राजकीय पुढारीच बेसुम...

कोपरगाव(प्रतिनिधी)


कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच कोपरगावचा पाणीप्रश्न तापू लागला आहे. सतत पाणीप्रश्नावरून राळ उठविणारे राजकीय पुढारीच बेसुमार पाणी वापर करत असून, पालिकेचा मोठ्या प्रमाणात कर बडवत असल्याचा सनसनाटी आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी करून पोलखोल केली आहे. याचबरोबर शहरातील पालिकेच्या संदर्भातील विविध प्रश्नांवरून पुढाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

पाणीप्रश्न आणि पालिकेचा कर बुडविणाऱ्यांची थेट पत्रकार परिषदेत नावे घेऊन नगराध्यक्ष वहाडणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मुख्य जलवाहिनीवर समता पतसंस्था, विजयकुमार काले, राजेंद्र झावरे, बस आगार, तालुका विकास मंडळ, बाळकृष्ण सारंगधर, विठ्ठल क्षत्रिय, बद्रीनाथ चावला, राजेंद्र वाणी, माजी सैनिक कार्यालय, संजय बोऱ्हाडे, अरुण वाणी, कल्याण गंगवाल, के.बी.पी. विद्यालय, साहेबराव शिलेदार, विकास सोसायटी पेट्रोल पंप, बोरावके मोटेल्स हे सतरा नळजोडणीधारक साधारण  २४ तास बेसुमार पाणी वापरतात. यातील राजेंद्र झावरे यांनीच मुख्य जलवाहिनीवरील जोडणी काढून टाकण्याबाबत पालिकेला पत्र दिलेलं आहे. तर १२ तासापेक्षा बाबासाहेब गाडे, शिवाजी संधान, राहुल रोहमारे, केशव भवर, जनाकीदेवी पडियार, केशव साबळे, नानासाहेब चांदगुडे यांसह ४८ नागरिक पाणी वापर करतात. आणि २४ तास पाणी वापर करणारे कमलिनी सातभाई वाचनालय, दिलीप वाघ, वायखिंडे, माधव जोशी, रवींद्र पाटील, द्वारकानाथ व्यास, विठ्ठल आदमाणे, सेवा निकेतन, होली फॅमिली चर्च, अंबादास साळुंके, वर्धमान पांडे यांसह संजय सातभाई हे ८ तास पाणी वापर करत असल्याचे वहाडणे यांनी स्पष्ट करून यांच्याकडून दहा पट पाणीपट्टी वसूल करावी असे म्हंटले आहे.

याचबरोबर हा पाणी पुरवठा १ ते दीड तासांवर आणण्याचे काम सध्या सुरू असून दोन महिन्यात पूर्णत्वास जाईल. परंतु, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुणीही दबाव आणू नये. यावरून पाणी कशामुळे कमी पडते हे शहरवासियांना समजू शकते. त्यामुळे नेत्यांनीही अशा प्रवृत्तींना पाठिशी घालू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

तसेच बसस्थानक समोरील चंदुलाल दिपचंदकाले यांच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील वाहनतळ जागेत व्यावसायिक गाळे बांधून विक्री केली आहे. यामुळे गाळेधारक आणि ग्राहकांना वाहने रस्त्यावर उभी करावी लागत असल्याने रहदारीला अडथळा येत असतो. याबाबत पालिकेने नोटीस दिलेली आहे. तसेच नीलेश भालेराव यांनी छत्रपती महाराज संकुलमध्ये घेतलेल्या गाळ्याचे सव्वा दोन लाख रुपये भाडे थकविण्याबरोबर डिपॉजिटही भरलेले नाही, शिवाय याचा खरा मालकही वेगळा आहे.  यावरून फुकट गाळा वापरण्याचा धंदा बिनबोभाट सुरू असून, पालिकेचे उत्पन्न बडवत आहे. वादग्रस्त सर्व्हिस स्टेशन प्रकरण फेटाळून न्यायालयाने जाधव यांना पाच हजार रुपये भरण्याचे आदेश दिलेले आहे. यामधून हातगाड्यावर व्यवसाय करणाऱ्यांकडून हफ्ते उकळणाऱ्यांची नावेही लवकरच उघड होणार असल्याचा इशारा देत थकबाकी गाळेधारकांना नोटिसा देऊन वसुलीसह गाळे सील करण्याची कार्यवाही देखील सुरू केली असल्याचे नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी नमूद केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत