राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी तालुक्यातील वाघाचा येथील दिव्यांग असलेले ह.भ.प साहेबराव जाधव यांना महाशिवरात्रीनिमित्त राहुरी फॅक्टरी येथील...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
राहूरी तालुक्यातील वाघाचा येथील दिव्यांग असलेले ह.भ.प साहेबराव जाधव यांना महाशिवरात्रीनिमित्त राहुरी फॅक्टरी येथील उद्योजक नरेंद्र चव्हाण व व्यावसायिक सुधीर पठारे यांनी व्हीलचेअर देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
वाघाचा आखाडा येथील ह.भ.प साहेबराव जाधव हे दोन्ही पायाने अपंग असल्याने त्यांना व्हील चेअरची नितांत गरज असल्याचे लक्षात येताच महाशिवरात्रीनिमित्त राहूरी फॅक्टरी येथे एन. सी.कन्स्ट्रक्शनचे नरेंद्र चव्हाण व सिद्धी इलेक्ट्रिकल्सचे सुधीर पठारे यांनी नवीन व्हीलचेअर भेट दिली. यावेळी प्रहार संघटनेचे मधुकर घाडगे, तुषार कदम, प्रसाद जाधव आदींसह मित्र परिवार उपस्थित होते.
सामजिक बांधिलकी जोपासत समाजातील दिव्यांगासाठी काम करण्यासाठी तरुणांनी पूढे येणे गरजेचे असून समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आम्ही कधीही मागे राहणार नाही असे नरेंद्र चव्हाण यांनी सांगितले यावेळी राहुरी तालुका प्रहार व वाघाचा आखाडा ग्रामस्थ उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत