कोपरगाव(वेबटीम) माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी निरप्याची भूमिका सोडून विस्थापित टपरी धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे कोप...
कोपरगाव(वेबटीम)
माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी निरप्याची भूमिका सोडून विस्थापित टपरी धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे कोपरगाव व्यापारी समितीने म्हंटले आहे.
विस्थापित गाळेधारक यांनी कोपरगावचे नगराध्यक्ष वहाडणे यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली होती. यावेळी वहाडणे यांचे निकटवर्तीय तथा माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी पत्रक काढून हे आंदोलन म्हणजे सवंग लोकप्रियता असून कोल्हे यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत आहे का ? असा सवाल उपस्थित केला होता. दरम्यान आज व्यापारी समितीने पत्रक काढून कांबळे यांच्यावर चांगल तोंडसुख घेतले आहे.
पत्रकात म्हंटले की, कोपरगांव शहरात १० मार्च २०११ रोजी अतिक्रमण मोहिम नावाच्या वादळ आल या वादळाने शहरातील अतिक्रमणाच्या नावावर जवळ पास तीस -चाळीस वर्षांपूर्वी च्या दोन हजार टपऱ्या काढल्या, अतिक्रमण काढण्याचा मूलभूत उद्देश रस्त्याचे रुंदीकरण व शहर सुशोभीत करणे येवढाच होता आणि याच हेतूने जबरदस्त पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणा खाली दबावतंत्र वापरून अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण हा शब्द तसा उच्चारायला खूप सोपा आहे.
परंतु अतिक्रमणाच्या नावावर जनजीवन उध्वस्त झालेल्या विस्थापितांच्या सध्या च्या स्थितीत असलेल्या वस्तुस्थितीचा ठाव घेणे खूप अवघड आहे.
१० मार्च २०११ रोजी अतिक्रमण निघत अस्ताना त्या पार्श्वभूमीवर आम्ही समाज सेवक म्हणून विस्थापित माता भगिनी थोर जेष्ठ वयोवृध्द सगळ्यांना धीर देण्याच कार्य करत होतो मोडकळीस पडलेल्या संसाराची जमवा जमाव करत होतो त्यांचे अश्रु पुसण्याचे काम करत होतो, त्या वेळेस माननिय संजय कांबळे साहेब आपण हाथ बाधून कोणाची गुलाम गिरी करत होता हे धारणगाव रोडच्या समस्त विस्थापितांना ज्ञात आहे. वर्षानुवर्ष काडी काडी जमा करून उभ केलेला संसार कोसळत असतांना काय वेदना होतात व्यापार व्यवसाय व उपजीविकेचे साधन नष्ट होताना काय वेदना होतात हे आम्ही जवळून बघितलं तो दिवस आजही आठवला तरी अंगावर शहारे येतात.या सर्व विस्थापितांना न्याय मिळाला पाहिजे या हेतूने मनाशी गाठ बांधून आम्ही वेळो वेळी शासन दरबारी तसेच माजी आमदार आदरणीय अशोक दादा काळे साहेब तसेच माजी आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे यांच्याशी चर्चा केली संवाद साधला निवेदने दिली त्यांनी देखील प्रामुख्याने प्रामाणिक प्रयत्न केले.परंतु पुन्हा काही राक्षशी वृत्ती आडव्या आल्या आणि ह्या विषया ला पुन्हा स्थगिती मिळाली आणी हा प्रश्न सुटू शकला नाही.
म्हणून कोपरगाव च्या जनतेने प्रामुख्याने विस्थापित टपरी धारकांनी हा प्रश्न सुटावा म्हणून राजकारणात बदल घडवत तिसरा पर्याय म्हणून नगराध्याक्ष विजयराव वहाडणे हा पर्याय निवडला आणि सत्तेच्या चाव्या विजयराव वहाडणे यांच्या ताब्यात दिल्या आणि का देऊ नये विस्थापितांना न्याय दिला जाईल, आधिकाऱ्यावर वचक निर्माण होईल, भ्रष्टाचार थांबवला जाईल, ठेकेदारीला आळा घातला जाईल, पाणी रोज दिल जाईल माता भगिनीची पाण्या साठी होणारी वणवण थांबवली जाईल, शहर धूळ मुक्त केले जाईल. असे एक ना अनेक गगन भेदी घोषणा भाषण आणि आश्वासन देऊन जनतेत विश्वास निर्माण केला जनतेनेही मताधिक्याने सत्तेची खुर्ची तुम्हाला बहाल केली.तुमच्या पडद्या मागील नेत्याला खुर्चीवर बसवण्यात विस्थापित टपरी धारकांचे देखील खूप मोठे योगदान आहे.
आज तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर विराजमान होऊन साडे चार वर्ष पूर्ण झाले, आणि आज तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन सांगतात विस्थापितांना न्याय मिळणार नाही इथं होतील तिथं होणार नाही असल्या प्रतिक्रिया देताना तुम्हाला कस काहीच वाटत नाही.
कुठ गेली तुमची वचन बद्धता एका शब्दात तुम्ही जनतेला निराशेचा डोंगरावरून कडेलोट करावं, ज्या कामामध्ये मलिदा मिळणार त्या कामासाठी मीटिंग वर मीटिंग आणि विस्थापित टपरी धारकांन चा विषय आला तर अडचणी समोर दाखवायच्या हे अस झाले कि दिल ही ना चाहे तो बहाणे हजार है !
वारे वा सरकार कोपरगाव व्यापारी समिती आपल कार्य स्वयम् फुर्तीने विस्थापितांच्या पाठीशी खंबीर पने उभी राहून डोळे उघडे ठेवून झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्याचं काम करत आहे. आणि या हेतूने बुधवार दी १० मार्च २०२१ रोजी अतिक्रमण मोहिमे ला 10 वर्ष पुर्ण झाले तरी देखील हा प्रश्न सुटला नाही म्हणून कोपरगांव व्यापारी समिती ने काळा दिवस पाळला या अनुषंगाने समितीचे सन्माननीय सदस्य व विस्थापित टपरी धारक नगर पालिका प्रशासनास भेटीस आले असता त्या ठिकाणी कोणी आढळून आले नाही म्हणून गांधीगिरी मार्गाने सन्माननीय आध्यक्ष साहेब व सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या खुर्चीला हार घातला आणि विस्थापितांचे प्रश्न लवकरात लवकर सुटावे म्हणून साकडे घातले हा विषय तुमच्या इतका जिव्हारी लागावा का?माननीय संजय कांबळे साहेब. विस्थापितांनी शहर सोडले तुम्हाला काही वाटलं नाही विस्थापितांना न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या हे तुम्हाला जिव्हारी लागल नाही का ? आणि खुर्चीला हार घातला म्हणून तुम्हाला एवढे जिव्हारी लागले विचारहीन विचार सरणी असता कामा नये.
आणि हो तुम्ही कायद्याची समज नाही असा आरोप करता माझी प्रामाणिक इच्छा आहे या पुढील कार्य काळात तुम्ही आम्हाला कायदा शिकवावा हे आम्ही आमचं भाग्य समजू. तुम्ही आरोप केला प्रसिद्धीच्या झोता साठी आम्ही विस्थापित टपरी धारकांन चां मुद्दा लाऊन धरला, अहो साहेब समाज कारण करता करता आमचा आतापर्यंतचा संपूर्ण जीवन समर्पित झाले आहे.आमच्या ओळखीला समाज सेवेची झालर आहे.
आम्ही आमच्या प्रतिक्रिया देताना निर्भिडपणेआणि स्वतंत्र विचार शैलितून आणी तेही स्वतः च्या लेखणी चा वापर करून करतो. दुसऱ्या सारखं निरप्याची भूमिका बजावत नाही आम्हाला प्रसिद्धीची हाव नाही.एकांतात बसुन जरा स्वतहाच् अस्तित्व शोधा म्हणजे कळेल प्रसिद्धीची गरज कोणाला आहे.राहिला प्रश्न धमक आणि हिमतीचा थोडा धीर धरा येणाऱ्या काळात हा प्रश्न देखील मार्गी लावू कोपरगांव व्यापारी समिती ही राजकीय नसून या मध्ये सर्व पक्षीय सन्माननीय सदस्य आहेत.
आणि एक विनंती आपल्या अपयशाला लपावण्या साठी कधी पर्यंत कोल्हे नावाचं शस्र वापरणार,आपल्या कडे सत्तेचे चार महिने बाकी आहे आपण विस्थापितांना न्याय द्या आमच्या वर कितीही टीका झाल्या चिखल फेक झाली तरी आमचा लढा अविरत पने चालू राहील आज आम्ही खुर्चीला हार घातला प्रश्न सुटल्यास तुम्हाला देखील आभिमाणाने हार घालू. संजय कांबळे साहेब आपणास कोपरगाव व्यापारी समिती चे वतीने विनंती करतो इतरांचे निरोप पोहाच करण्यापेक्षा विस्थापित टपरी धारकांच्या पाठीशी उभे रहा पुण्य मिळेल. आणि हो आपण देखील नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले होते ते जनतेचे प्रश्न सोडवायला मात्र त्या नंतर काही काळात आपला वापर फक्त कधी मधी आठवण झाल्यावर निरोप देण्यापूरता केला जातो आपण एक सच्चे कार्यकर्ते म्हणून एकही प्रश्न मांडताना दिसले नाही हे जनता जाणून असल्याचे कोपरगाव व्यापारी समितीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत