देवळाली प्रवराच्या तत्कालीन तलाठ्यासह एकावर गुन्हा दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराच्या तत्कालीन तलाठ्यासह एकावर गुन्हा दाखल

  देवळाली प्रवरा(वेबटीम)       सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद असताना देखील तलाठ्याच्या मदतीने  सातबारा उताऱ्या फेरफार करुन कर्जाची नोंद काढु...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

      सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद असताना देखील तलाठ्याच्या मदतीने  सातबारा उताऱ्या फेरफार करुन कर्जाची नोंद काढुण टाकून शेत जमीन विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल येवले यांनी राहुरी न्यायालयात दाखल केलेल्या खाजगी फिर्यादी वरुन राहुरी पोलिस ठाण्यात देवळाली प्रवराचे तत्कालीन तलाठी जालिंदर पाखरे व  अरुण सुखदेव वाळके या  शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   राहूरी फॅक्टरी येथील अनिल रामभाऊ येवले यांनी राहुरी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करुन तत्कालीन तलाठी जालिंदर पाखरे व अरुण वाळके या शेतकऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. येवले यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,  दिनांक १७ मे २०१७  ते १९ मे २०२० दरम्यान देवळाली प्रवरा येथील अरुण सुखदेव वाळके याने स्वतःच्या शेतजमिनीच्या सातबारा  उताऱ्यावर सेंट्रल बँकेचे कर्ज नोंद असताना सातबारा उताऱ्यावरील बँकेच्या कर्जाची नोंद काढुन टाकुन फेरफार करुन फिर्यादी येवले यांना सदर जमिनीची विक्री केली.परंतू खरेदी खताची नोंद मंजुर झाल्या नंतर सेंट्रल बँकेने कर्ज नोंद असताना खरेदीखत नोंद मंजुर कशी केली याची विचारणा केली.यावरुन येवले यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर येवले यांनी राहुरी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. त्यामध्ये अरुण सुखदेव वाकळे व तत्कालीन कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांनी सातबारा उताऱ्यात फेरफार करुन सातबारा उताऱ्यावरील कर्जाची नोंद काढुन टाकून    फसवणूक केली.

           देवळाली प्रवरा शिवारातील शेत जमीन गट क्रमांक १७०/१ क्षेत्राचा बनावट सातबाराचा उतारा तयार करून तो जमिनीच्या मोजणीसाठी व विक्रीसाठी वापरला,इतर सरकारी कामात वापरून शासनाची व माझी फसवणूक केली आहे. राहुरी न्यायालयाच्या आदेशा नुसार तत्कालीन तलाठी पाखरे व वाळके दोघां विरोधात  गुन्हा र. नं २०९/२०२१ भादवि कलम ४२०,४६५,४६८,४७१,५०४,५०६ , ३४ प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे करीत आहे.

 

खरेदी नोंद रद्द करण्याची लेखी मागणी प्रांतधिकाऱ्यांकडे केली होती- पाखरे

           देवळाली प्रवरा येथील शेतकरी अरुण सुखदेव वाळके या शेतकऱ्याने  सेतू केंद्रातून बनावट सातबारा काढुन बनावट सही शिक्क्याचा वापरुन शेत जमिन विक्रीसाठी वापरला.अनिल येवले यांनी आँनलाईन इंडेक्स टाकून खरेदी नोंद करण्याची विनंती केली. त्यानुसार खरेदी नोंद मंजुर झाली. परंतू  सेंट्रल बँकेने कर्जाची नोंद असताना खरेदी खत नोंद मंजुर कशी करण्यात आली अशी तक्रार केल्या नंतर अनिल येवले यांची खरेदी खत मंजुर नोंद रद्द करुन मिळण्यासाठी प्रांतधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केली होती. असे तत्कालीन तलाठी जालिंदर पाखरे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत