माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला

  कोपरगाव(वेबटीम) गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या रवंदे हनुमानवाडी ते मळेगाव थडी या रस्त्याचे काम मार्गी लावुन माजी आमदार स्नेह...

 कोपरगाव(वेबटीम)


गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या रवंदे हनुमानवाडी ते मळेगाव थडी या रस्त्याचे काम मार्गी लावुन माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी दिलेला शब्द पुर्ण केला असल्याचे प्रतिपादन मळेगाव थडीच्या सरपंच सौ अनिता किरण उगले यांनी केले.

कोपरगाव मतदार संघातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या मळेगाव थडी येथील रस्त्याची मोठया प्रमाणात दुरावस्था झालेली होती. दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या रस्त्याचे काम करण्यात यावे म्हणून तत्कालीन आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांचेकडे ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानुसार सन 2018-19 च्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या कामाचा समावेश करून घेतला. त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडून या कामासाठी सौ कोल्हे यांनी सुमारे 2 कोटी 64 लाख 19 हजार रूपये इतका निधी मंजूर करून आणला. या निधीतून रवंदे हनुमानवाडी ते मळेगाव थडी रस्ता ग्रामीण मार्ग 12 या सुमारे 5 किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पुर्ण करणार असल्याचे सौ कोल्हे यांनी सांगितले होते. त्यााप्रमाणे मळेगाव थडी ग्रामस्थांना दिलेला शब्द या रस्त्याचे काम पुर्ण करून सौ कोल्हे यांनी खरा केला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार असेही सौ उगले यांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत