धारणगाव रोडची जड वाहतूक इंदिरा पथ रस्त्याने वळवावी - अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धारणगाव रोडची जड वाहतूक इंदिरा पथ रस्त्याने वळवावी - अँड.नितीन पोळ

कोपरगाव(वेबटीम) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जवळ रस्त्याचे गटारीचे काम सुरू आहे त्यामुळे शहरातून होणारी जड वाहतूक इंदिरा पथ मार्गे वाळव...

कोपरगाव(वेबटीम)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जवळ रस्त्याचे गटारीचे काम सुरू आहे त्यामुळे शहरातून होणारी जड वाहतूक इंदिरा पथ मार्गे वाळवावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक या रस्त्यावरून संजीवनी व कोळपेवाडी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मोठी वाहतूक असते मात्र काही दिवसांपासून या रस्त्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या शेजारी गटारीचे काम सुरू आहे त्या मुळे ही वाहतून बस स्टॅण्ड जवळून -अहिंसा स्तंभ - गुरुद्वारा रोड वरून अण्णा भाऊ साठे खुले नाट्य गृह किंवा नगर पालिकेजवळून माधव बाग अशी वळविण्यात आली आहे गुरुद्वारा रोडवर नेहमी वर्दळ असते त्यातच ही ऊस वाहतूक करणाऱ्या बैल गाड्या ट्रॅक्टर आदी जड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर मोठी गर्दी होत आहे मागील काही दिवसापूर्वी माधव बागेजवळ ऊस वाहतूक करणारी ट्रॉली पलटी झाली होती त्यामुळे गुरुद्वारा रोडवर अशा प्रकारे होणारी वाहतूक कोंडी मुळे अनेक नागरिकांना त्रास होत आहे. छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या जवळ डॉ.कोठारी कोविड ,डॉ.फडके,डॉ.जपे,डॉ.वाघडकर,डॉ.गायकवाड, डॉ बुब, डॉ.आढाव, आदी  हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक पेशंट ने- आण करणाऱ्या रुग्णवाहिका सुरू असतात .त्यामुळे ह्या रस्त्याचे काम होई पर्यंत ही जड  वाहतुक छत्रपती संभाजी महाराज सर्कल वरून इंदिरा पथ वरून मार्केट यार्ड वरून वाळवली तर वाहतूक कोंडी होणार नाही व किरकोळ अपघात देखील टाळता येतील असे पोळ यांनी म्हंटले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत