भानुदास महाराज गायके यांना वळण ग्रामस्थांनी वाहिली श्रद्धांजली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भानुदास महाराज गायके यांना वळण ग्रामस्थांनी वाहिली श्रद्धांजली

 वळण/प्रतिनिधी          ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ. प. भानुदास महाराज गायके यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले आहे.त्यामुळे वळण पंचक्रो...

 वळण/प्रतिनिधी 

       ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ. प. भानुदास महाराज गायके यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले आहे.त्यामुळे वळण पंचक्रोशीतच मोळी हळहळ व्यक्त केली जात असुन याठिकाणी श्रद्धांजली देखील वाहण्यात आली आहे.

  बन्सी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षांपासून वळण येथील अखंड हरीनाम सप्ताह चे अखंडितपणे नित्यनेमाने गायके महाराज यांची व्यासपीठ चालविले.त्यांचा या पचंक्रोशित मोठा भक्तगण होता.कालच त्यांचे निधन झाल्याने गावामधे हळहळ व्यक्त केली जात आहे. तर सकाळी हनुमान मंदिरासमोर सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

   याप्रसंगी बाजार समितीचे संचालक  दत्ताञय खुळे ,उपसरपंच एकनाथ खुळे, बी.आर.खुळे, अशोक कुलट, मुकिंदा काळे ,ज्ञानेश्वर खुळे, बाबासाहेब कार्ले, हरीभाऊ आढाव,उमेश खिलारी, रोहिदास आढाव,बाबासाहेब आढाव, सारंगधर खुळे, मच्छिद्र डमाळे, सुरेश मकासरे, धनंजय आढाव,बबन चव्हाण आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत