श्रीरामपूर(वेबटीम) तालुक्यातील कुरणपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विखे गटाच्या व माजी सरपंच प्रकाश पारखे यांच्या पत्नी सौ मनीषा प्रकाश पारखे...
श्रीरामपूर(वेबटीम)
तालुक्यातील कुरणपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विखे गटाच्या व माजी सरपंच प्रकाश पारखे यांच्या पत्नी सौ मनीषा प्रकाश पारखे यांची बिनविरोध निवड झालेली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक गेल्या १महिन्यापूर्वी पार पडली. या निवडणुकीत विखे गटाकडे एक हाती सत्ता आली मात्र सरपंचपद निवडीमध्ये आरक्षण पडलेला उमेदवार निवडून आला नसल्याने सरपंच पदाचा पेच निर्माण झाला होता .यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये नवीन आरक्षण जाहीर होऊन इतर मागास वर्गीय उमेदवारास सरपंचपद जाहीर झाले होते.त्यानुसार सरपंच पदासाठी माजी सरपंच प्रकाश पारखे यांच्या पत्नी सौ.मनीषा प्रकाश पारखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात आणखी एका ग्रामपंचायत सदस्याने अर्ज भरला मात्र वेळेत तो परत काढण्यात आल्याने सौ. मनीषा पारखे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे या निवडणुकीमध्ये विखे कारखान्याचे माजी संचालक शामराव चिंधे ,रामदास देठे ,बाळासाहेब पारखे ,मंजाबापू निबे ,पोपट हळनोर ,ज्ञानदेव हळनोर ,लक्ष्मण चिंधे अण्णासाहेब पारखे अशोक देठे प्रमोद लोंढे राजेंद्र चिंधे ,मच्छिंद्र देठे, गंगाधर हळनोर ,लहानु थोरात, आप्पासाहेब देठे, नुतन ग्रामपंचायत सदस्य सौ. शिल्पा रवींद्र पारखे ,सौ.छाया बाबासाहेब चिंधे ,संतोष रायभान हळनोर आदींनी या निवडीसाठी परिश्रम घेतले.
नूतन सरपंच सौ.मनीषा पारखे यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत