कोपरगाव(प्रतिनिधी) संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा पुतळा पिपरा काला गाव जि.बलिया उत्तरप्रदेश येथे काही मनुवादी समाज कंटकानी वाईट हेत...
कोपरगाव(प्रतिनिधी)
संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा पुतळा पिपरा काला गाव जि.बलिया उत्तरप्रदेश येथे काही मनुवादी समाज कंटकानी वाईट हेतुपूर्वक व समाजात तेढ निर्माण करून सामाजीची भावना दुखावेल अश्या हेतूनी पुतळ्याची तोडफोड करून जाळण्यात आला असल्या कारणाने त्या मधील आरोपीना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा द्यावी या करिता कोपरगाव चर्मकार विकास संघाच्या वतीने कोपरगाव तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदार श्रीमती. कुलकर्णी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
संत गुरु रविदास महाराज यांनी ६०० वर्षापूर्वी बंधुभाव समतेचे व समानतेचे मोठे कार्य केल्याने आज संपूर्ण जगात संत गुरु रविदास महाराजांचे अनुयायी प्रेरणा घेऊन कार्य करीत आहे.या समुदायाच्या तसेच संत व महापुरुषांच्या विचाराचे कार्य करणाऱ्या बांधवांच्या भावना दुखावण्याचे काम काही समाज कंटकानी केले आहे.
अशा वृत्तीच्या अपराधीला पकडून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी कोपरगाव चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली.यावेळी रंगनाथ कानडे,कचरू लोहकरे,आकाश कानडे,विशाल पोट,मोहित पोटे,सतीश शिंगाणे,गणेश थोरात आदि समाज बांधव उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत