विधानसभेच्या सभागृहात ३२ गावाचा पाहुणा दोन्ही घरी उपाशी राहिला! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विधानसभेच्या सभागृहात ३२ गावाचा पाहुणा दोन्ही घरी उपाशी राहिला!

देवळाली प्रवरा प्रतिनिधी        राहुरी तालुक्यातील 32 गावे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघास जोडली आहे. 32 गावांना तालुका राहुरी असल्याने राहु...

देवळाली प्रवरा प्रतिनिधी 

      राहुरी तालुक्यातील 32 गावे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघास जोडली आहे. 32 गावांना तालुका राहुरी असल्याने राहुरी व श्रीरामपूर तालुक्याचे दोन आमदार असतानाही 32 गावातील मतदार माञ "दोन्ही घरचा पाहुणा उपाशी" अशी अवस्था झाली आहे.आ.लहू कानडे यांनी गुरुवारी विधानसभेच्या सभागृहात श्रीरामपूर मतदार संघातील प्रश्नाचा पाऊस पाडला.परंतू राहुरी तालुक्यातील 32 गावातील प्रश्ना संदर्भात एक हि शब्द बोलले नसल्याने 32 गावातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

   गुरुवारी विधानसभेत पुरवणी मागण्या बाबत बोलताना आमदार लहू कानडे श्रीरामपूर तालुक्यातील प्रश्न पोट तिडकीने मांडताना दिसले.त्या मध्ये वैजापूर तालुक्याला जोडणारा रस्ता, परीवहन महामंडळाची जागा, अतिक्रमणे, श्रीरामपूर नगर पालिका पाणी पुरवठा, घरकुलांसाठी जागा उपलब्ध करणे, भंडारदरा धरणावरील कालव्यांचे पुर्नबांधणी करावी असे अनेक प्रश्न मांडले परंतू हे प्रश्न मांडत असताना आ.कानडे यांना माञ श्रीरामपूर विधानसभा मतदार संघास जोडलेली राहुरी तालुक्यातील 32 गावातील पाणी प्रश्न, पुर्व भागातील रस्ते, अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांची नुकसान भरपाई, पिक विमा, आदी प्रश्न जिवणमरण प्रश्नाची निगडीत असल्याने आ.कानडे यांनी लक्ष देणे गरजेचे होते.विधानसभेत बोलताना 32 गावांच्या प्रश्नांचा त्यांना विसर पडला आहे.ग्रामास्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

                देवळाली प्रवरा नगर पालिकेत काही दिवसापुर्वीच 32 गावाच्या प्रश्ना बाबात बैठक घेतली होती.या बैठकीत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.अशी गर्जणा केली. ती गर्जणा त्या सभागृहा पुरतीच होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या विरोधकांनी आ.कानडे यांची लाज काढुण तीव्र शब्दात निषेध केला होता. त्यांच्या मांडीलामांडी लावून बैठक घेण्यात आली. नगर पालिकेचे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित  करण्यात आले. त्या नगर पालिकेचे प्रश्नही विधानसभेच्या सभागृहात गेल्यावर विसर पडला की काय?  नगर पालिकेच्या सभागृहात झालेल्या बेठकी बद्दल महाविकास अघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

             राहुरी तालुक्यातील 32 गावे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघास जोडलेली असल्याचा आ.कानडे यांना विसर पडला की काय मतदार संघ श्रीरामपूर तर तालुका राहुरी असल्याने दोन आमदार असतानाही "दोन्ही घरचा पाहुणा उपाशी" अशी अवस्था येथील ग्रामस्थांची झाली आहे.32 गावातील मतदारांनीही आ.कानडे यांना मतदान केले आहे. आ.कानडे पेक्षा माजी आ. भाऊसाहेब कांबळे बरे होते असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत