शिक्षक बँकेत घड्याळ वाटपातही मोठ्या प्रमाणावर अनियमितता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिक्षक बँकेत घड्याळ वाटपातही मोठ्या प्रमाणावर अनियमितता

अहमदनगर (प्रतिनिधी)  अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या घडयाळ खरेदी भ्रष्टाचाराबाबत रोहोकलेप्रणित गुरूमाऊली मंडळाने सातत्याने विविध पात...

अहमदनगर (प्रतिनिधी)

 अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या घडयाळ खरेदी भ्रष्टाचाराबाबत रोहोकलेप्रणित गुरूमाऊली मंडळाने सातत्याने विविध पातळ्यावर आवाज उठवून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे चौकशीची मागणी केली होती प्रसंगी घंटानाद आंदोलनही करण्यात आले होते.

 उपनिंबधक कार्यालयाकडून चौकशी  चालू असतानाच बँकेच्या विविध शाखांकडून प्राप्त झालेल्या घड्याळ वाटप अहवालावरून घड्याळ वाटपातही मोठ्याप्रमाणावर अनियमितता झाली असल्याचा गैरप्रकार समोर आला आहे.    

      शिक्षक बँकेच्या मुजोर सत्ताधाऱ्यांनी  सभासदांच्या कष्टाच्या व घामाच्या पैशांतून घेतलेल्या घड्याळाची अव्वा ते सव्वा किंमतीने खरेदी केलेली आहेच.परंतू शिक्षक बँकेच्या विविध शाखांमधून बँकेच्या पदाधिका-यांशिवाय सत्ताधारी मंडळाच्या प्रमुख नेत्यासह इतर नेत्यांनीही बँकेतून मोठ्या संख्येने घड्याळे ताब्यात घेतली असल्याची बाब समोर आली आहे. मग नेमकी हि घड्याळे कुठे गेली ? हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. या घड्याळांचा प्रवास नेमका कोणत्या बाजारापर्यंत झाला असा सवाल रोहोकलेप्रणित  गुरुमाऊलीचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी सत्ताधा-यांना केला आहे.             

    सभासदांना वाटपासाठी गुजरात येथून खरेदी केलेली घड्याळे वाजवी किमतीपेक्षा दुप्पट भावाने खरेदी करुन जवळजवळ ३५ लाखाचा अपहार सत्ताधाऱ्यांनी केलेला असून याबाबत जिल्हा निबंधक यांच्याकडे गुरूमाऊलीचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, गणेश वाघ व संतोष खामकर यांच्या तक्रारीवरून चौकशी सुरू असून बँकेकहून प्राप्त झालेल्या घड्याळ वाटपाच्या याद्यांमधून आता नवीनच घोटाळा पुढे आला आहे. शताब्दीनिमित्त खरेदी केलेल्या घडयाळ वाटपात सत्ताधाऱ्यांनी मोठी अनागोंदी केलेली आहे. 

सत्ताधारी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार चालू असला तरी सभासद म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने त्यांनी घडयाळे बँकेतून नेलीच कशी ? याचे सबळ पुरावे उपलब्ध झाल्यामुळे आता घड्याळ घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान नव्याने वाटपातील अनियमिततेच्या चौकशीची मागणी आम्ही केली आहे.अशी माहीती गुरुमाऊलीचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत