नगरच्या 12 हॉस्पिटलमध्ये 2 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगरच्या 12 हॉस्पिटलमध्ये 2 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक !

  अहमदनगर : वेबटीम   जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. 24 तासात तब्बल 2795 रुग्ण नव्याने आढळले आहेत, त्यात ऑक्सिजन बेड मिळत नसल्या...

  अहमदनगर : वेबटीम 


 जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. 24 तासात तब्बल 2795 रुग्ण नव्याने आढळले आहेत, त्यात ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने  मृत्युदर चिंताजनक आहे, शिवाय नगरच्या 12 हॉस्पिटल मधील उपलब्ध ऑक्सिजन देखील पुढील 2 तास अर्थात दुपारी 4 वाजेपर्यंतच पुरेल, अशी माहिती लोकमत वृत्तवाहिनेने ट्विटरद्वारे प्रसारित केली आहे.
 

  जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वच रुग्णालये हाऊसफुल आहेत. बेड मिळत नसल्याने रुग्ण मरत आहेत. ऑक्सिजन पुरवठा कमी आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे, त्यात फक्त दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असून नगरच्या 12 हॉस्पिटलमधला साठा दोन तासात संपणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीकडून मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत