राहुरी : प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील वरवंडी शिवारातील मुळा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर राहुरी पोलिसांनी पकडला असुन ...
राहुरी : प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील वरवंडी शिवारातील मुळा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर राहुरी पोलिसांनी पकडला असुन ३ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
.वरंवडी मुळा नदी पात्रातून वाळू वाहतूक करणारा पांढ-या 5 MH-16 CC-9563 क्रमांचा टाटा कंपणीचा ढंपर ३ ब्रास बाळुसह सोमवारी मध्यरात्री वरवंडी गावातील चौकामध्ये पकडला आहे. या प्रकरणी पोलीस हे.काॅ. आदिनाथ पाखरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी आदिनाथ गोकुळ बर्डे वय 26 राहणार धनगरवाडी तालुका जिल्हा अहमदनगर याच्याविरोधात गु.र.न.व कलम 312/2021 भादवी कलम 379 प्रमाणे राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.ना.एस.एम.जाधव करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत