देवळाली प्रवरा प्रतिनिधी राहूरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण न...
देवळाली प्रवरा प्रतिनिधी
राहूरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.देवळाली प्रवरा राहुरी फँक्टरी येथील काही भागात 31 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.रविवारी रुग्ण संख्या वाढली असली तरी सोमवारी माञ देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी येथे अवघे 9 रुग्ण कोराना बाधित आढळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सोमवारी कोरोना बाधित रुग्ण संख्या घटली दोन दिवसात 39 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तरी ही नागरिकांनी काळजी घ्यावी मास्क, सँनिटायझर, सामाजिक अंतर ठेवले तर अशीच रुग्ण संख्या कमी कमी होत जावून एक दिवस कोरोना हद्दपार होवून नागरिकांना दिलासा मिळेल पण हे सर्व नागरिकांच्या हातात आहे.
राहूरी तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण सँख्या वाढत आहे.रविवार दि.25 रोजी तालुक्यात दिवसभरात 183 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
तर देवळाली प्रवरात व राहूरी फॅक्टरीत गेल्या दोन दिवसात अवघे 39 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. रविवारी रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती.सोमवारी रुग्ण संख्या घटली देवळाली प्रवरात अवघे 3 तर राहुरी फँक्टरी येथे 5 रुग्ण असल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.कोरोना हद्दपार होवू शकतो पण तो नागरिकांच्या हातात आहे.गेल्या दोन दिवसात रुग्ण संख्या घटली असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी.रुग्ण संख्या घटली म्हणून लेगेच बाहेर पडू नये. कामानित्त बाहेर येणाऱ्या नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत