अकोले : प्रतिनिधी कोरोना कक्षात असलेल्या आपल्या प्रेयसीला भेटण्याची ओढ लागल्याने अखेर त्या मजनुने न राहवून शासनाचे बंधना...
अकोले : प्रतिनिधी
कोरोना कक्षात असलेल्या आपल्या प्रेयसीला भेटण्याची ओढ लागल्याने अखेर त्या मजनुने न राहवून शासनाचे बंधनाबरोबर कोव्हिडं केंद्राची भिंत देखील धाडसाने ओलांडली, मात्र स्वछतागृहात प्रेमाच्या आणाभाका घेऊन ही जोडी सुखी संसाराचे स्वप्न रंगवत असतानाच एका महिलेने आरडाओरडा केला आणि रात्री 11 वाजता एकच गोंधळ उडाला. या मजनूला सुरक्षा रक्षकांनी चोप दिल्याने तो पळून गेला तर ती मुलगी गुपचूप आपल्या बेडवर जाऊन पुन्हा कॉरनटाइन झाली.
अकोल्यातील एका प्रतिष्ठीत आणि सुशिक्षित घरात कोरोनाने कहर केला आणि दुर्दैवाने घरातील दोन्ही कर्ते व्यक्ती पॉझिटीव्ह आले. त्यानंतर त्यांच्या घरातील अल्पवयीन मुलीला देखील कोरोनाची लगण झाली. तिला उपचारासाठी अगस्ति येथील कोविड सेंटरवर दाखल करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने मोबाईलचा वाढता अतिरेख हा किती आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अवघ्या काही वयाच्या मुलीचे प्रेम एका तरुणावर जडले आणि त्यांची चर्चा सुरू झाली. बोलबोल करता त्यांच्यातील विरह हा देवदास आणि पोरो यांच्यासारखा झाला होता. त्यामुळे, त्यांनी काल रात्री 11 वाजणच्या सुमारास भेटण्याचे ठरविले.
दरम्यान हा तरुण पॉझिटीव्ह नसल्यामुळे, त्याला कोविड सेंटरवर जाणे शक्य नव्हते. त्यामुळे, तो गेल्या दोन दिवसांपासून तेथे घिरट्या घालत होता. त्यांना विरह सहन होईना म्हणून त्यांनी भेटण्याचे ठरविले आणि ते भेटले देखील. हा प्रकार तेथील सुरक्षा रक्षकाने पाहिला. मात्र, त्यांना वाटले कोणीतरी नातेवाईक असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, बराच वेळ झाला तेव्हा यांनी एक भिंत पार करून एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारल्या. काही काळ जातो ना जातो तोच हे दोघे अचानक गायब झाले. तोवर अर्धा तास होत आला होता. मात्र, जेव्हा एक महिला टॉयलेटसाठी गेली तेव्हा तिच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर कोविड सेंटरमध्ये एकच खळबळ उडली.
या दोघांना नंतर पकडले असता त्यांनी सांगितले की, आम्ही लोकांच्या भितीपोटी शौचालयात दडून बसलो होतो. कालांतराने हा प्रकार रात्री 12 वाजता प्रशासकीय अधिकार्यांच्या कानावर घातला असता दिवसभर काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी रात्री कोविड सेंटरवर दाखल झाले. त्यांनी संबंधित प्रेमवेड्या तरुणाला चांगलाच प्रसाद दिला. त्यानंतर त्याची कोविड टेस्ट करण्याचा अग्रह झाला असता त्याने तेथून पळ काढला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत