उंबरे : प्रतिनिधी येथे आज सकाळी हनुमान जयंती सोशल डिस्टन्स पालन करत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उंबरे ग्रामस्थांनी संकटमोचक...
उंबरे : प्रतिनिधी
येथे आज सकाळी हनुमान जयंती सोशल डिस्टन्स पालन करत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उंबरे ग्रामस्थांनी संकटमोचक हनुमंतरायाकडे अखंड मानवजातीवर आलेले कोरोना संकट निवारणासाठी हनुमान चालीसेतून साकडे घातले.
उंबरे गावात दरवर्षी रामनवमी ते हनुमान जयंती सप्ताह साजरा केला जातो. मात्र यावर्षीही कोरोना संकटामुळे हा सप्ताह स्थगित करण्यात येऊन सात दिवस विना सुरु ठेवत सप्ताह परंपरा कायम सुरू ठेवली. आज हनुमान जयंतीला ग्रामदैवत हनुमान मंदिरात गोरक्षनाथ महाराज उंबरेकर यांच्या अधिपत्यात हभप बाळासाहेब डेंगळे महाराज, माऊली बारवेकर महाराज, सोपान क्षीरसागर, मच्छीद बारवेकर, जेडी भाऊसाहेब, संपतराव ढोकणे, शिवाजी ढोकणे, एकनाथ ढोकणे, आप्पासाहेब ढोकणे, रावसाहेब आढाव, सोपान दुशिंग, काशीनाथ दुशिंग, आदीनी उपस्थित राहून हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा केला.
यावेळी भजन करण्यात आले. विविध उपदेशपर अभंग गाऊन प्रभू हनुमंत चरणी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. बरोबर सकाळी 6.15 मिनिटांनी पुष्पवर्षाव करून 'जय बजरंग बली हनुमान की जय'चा जयघोष करत हनुमान जन्माचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर अनिकेत तोडमल यांनी गोड प्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी कोरोना संकट निवारण्यासाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत