एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात 49 पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात 49 पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू

देवळाली प्रवरा(राजेंद्र उंडे) कोरोनाच्या दुसरया लाटेचा सर्वाधिक तडाखा राज्यातील पत्रकारांना बसला असून एकट्या एप्रिल महिन्यात राज्यातील तब्बल...

देवळाली प्रवरा(राजेंद्र उंडे)

कोरोनाच्या दुसरया लाटेचा सर्वाधिक तडाखा राज्यातील पत्रकारांना बसला असून एकट्या एप्रिल महिन्यात राज्यातील तब्बल 49 पत्रकारांचे  कोरोनानं बळी घेतले आहेत.. ऑगस्ट 2020 पासून आजपर्यंत कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांची संख्या आता 121 वर पोहोचली आहे असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.

            कोरोनानं राज्यात हाहाकार माजवला आहे.. ऑक्सिजन आणि व्हेटिलेटरचा तुटवडा, ढेपाळलेली सरकारी यंत्रणा आणि क़ुर पक्षीय राजकारणाचा फटका कोरोना रूग्णांना बसतो आहे.. कोरोना रूग्णांची किती ससेहोलपट सुरू आहे आणि कशी लूट केली जात आहे याचा पुरावा म्हणून सोलापुरच्या पत्रकाराची व्हायरल क्लीप बघता येईल.. व्यवस्थित उपचार मिळत नसल्याने पत्रकारांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं असल्याचा आरोप एस.एम.देशमुख यांनी केला आहे. 

.. मार्च महिन्यात 18 पत्रकारांचे मृत्यू झाले होते.मात्र एप्रिलमध्ये हा आकडा तिपटीने वाढून 49 वर पोहोचला आहे. त्यामुळे मार्च आणि एप्रिलमधील मृत पत्रकारांची संख्या 67 वर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये सरासरी दोन दिवसाला तीन पत्रकार मृत्युमुखी पडले आहेत.. राज्यातील कोरोना बाधित पत्रकारांची संख्या 5000पेक्षा जास्त असून किमान 200 पत्रकार राज्यातील विविध रूग्णालयात सध्या उपचार घेत आहेत. होम कॉरंनटीइन असलेल्या पत्रकारांची संख्या देखील मोठी आहे.

महाराष्ट्र सरकारने पत्रकारांकडे दुर्लक्ष केले आहे.उपचाराची कोणतीही काळजी घेतली जात नाही, दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना मदत दिली जात नाही.. मध्य प्रदेश सरकारने दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांच्या खात्यावर पाच लाख रूपयांची रक्कम जमा करायला सुरूवात केली आहे.. महाराष्ट्रात मात्र वारंवार मागणी करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.. सरकारच्या या भूमिकेमुळे माध्यमातील सर्वजण हतबल झाले असल्याने एस.एम.देशमुख 1 मे रोजी आत्मक्लेष आंदोलन  करीत आहेत.. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागातील  देखील आत्मक्लेष आंदोलन करणार आहेत.. सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कोणालाही बाहेर पडता येणार नाही.. घरात बसूनच सारे पत्रकार दिवसभर अन्नत्याग करतील.. एस.एम.देशमुख बीड जिल्हयातील देवडी या गावी माणिकबाग  या आपल्या फार्म हाऊसवर हे आंदोलन करणार आहेत.

*आत्मक्लेष आंदेलना संबंधी महत्वाचे*

महाराष्ट्रात गेल्या 9 महिन्यात 121 पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत.. एकट्या एप़िल महिन्यात 49 पत्रकार आपल्याला सोडून गेले आहेत.. आपल्या डोळ्यासमोर आपले मित्र जात असताना आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाहीत ही अगतिकता क्लेशदायक आहे.. ज्या व्यवस्थेवर आपली भिस्त आहे त्या व्यवस्थेने आपल्याला आणि एकूणच समाजाला वारयावर सोडलं आहे.. त्यामुळे राज्यभर हाहाकार उडालेला आहे.. उपचार व्यवस्थित होत नाहीत आणि लूट ही मोठी चालू आहे.. सरकार ती थांबवू शकलेले नाही.. पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर संबोधावे, सर्व वयोगटातील पत्रकारांना लस दिली जावी, उपचारासाठी राखीव बेडची व्यवस्था व्हावी, दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना अन्य काही राज्यांप्रमाणे आर्थिक मदत दिली जावी अशा मागण्या आपण वारंवार केल्या पण सरकारनं त्याची दखल घेतली नाही. कोरोना स्थितीमुळे सारेच घरात अडकून पडल्याने काहीच करता आले नाही.. तात्पर्य आम्ही सारे हतबल आणि अगतिक झालो.. मात्र गप्प बसूनही चालणारे नव्हते.. आपल्या संतप्त भावना सरकारच्या कानावर सातत्यानं गेल्याच पाहिजेत म्हणून आपण आत्मक्लेष आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.. खरं म्हणजे अगोदर मी एकटाच आत्मक्लेष करणार होतो मात्र माझ्या आंदोलनास राज्यभर पाठिंबा दिला जात आहे.. मी सर्वांचा आभारी आहे..

आंदोलन करताना आपण काळजी घ्यावी ही विनंती आहे.. सध्या लॉकडाऊन असल्याने घरात बसूनच हे आंदोलन करावे.. तेथेही लॉकडाऊनचे नियम पाळावेत .. सोशल डिस्टस्टिंग, सॅनिटायझर वगैरे पथ्ये पाळली जावीत.. आपण आत्मक्लेष आंदोलन करीत असल्याच्या जास्तीत जास्त पोस्ट सोशल मिडियावर टाकाव्यात.. या पोस्ट मेलवरून मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री विरोधी पक्ष नेते यांनाही पाठवाव्यात. ज्या तालुका, जिल्हा संघांना शक्य आहे त्यांनी एक किंवा दोन पदाधिकारयांनी तहसिल अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन द्यावे.. कोणत्याही परिस्थिती प्ंतयेकानं आपली काळजी घ्यावी.. 

मी बीड जिल्हयातील देवडी येथील माझ्या "माणिकबाग" या फार्म वर आंदोलन करीत आहे.. सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत माझे आंदोलन असेल..कृपया मला भेटण्यासाठी कोणी येऊ नये.. आत्मक्लेष आंदोलनास बेळगावपासून नागपूर, गडचिरोली पर्यत सर्वत्र पाठिंबा दिला जात आहे.. सर्वांचे मनापासून आभार..

      एस.एम.देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत