कोपरगाव शिवसेनेचे विविध मागण्यांकरिता पालिकेला निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शिवसेनेचे विविध मागण्यांकरिता पालिकेला निवेदन

कोपरगाव/प्रतिनिधी उत्तर नगर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच विविध मागण्यांचे निवेदन कोपरगाव पा...

कोपरगाव/प्रतिनिधी

उत्तर नगर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच विविध मागण्यांचे निवेदन कोपरगाव पालिकेला देण्यात आले.

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शहराचा कोरोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी पालिका अहोरात्र परिश्रम घेत आहे.  मात्र, सध्या राज्य शासनाने घोषित केलेल्या संचार बंदीमुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य आहे.  त्यामुळे सर्व रस्त्यांची कामे उच्च दर्जाची करावी. कारण, मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य वाढल्याने फुप्फुसाचे व श्वसनाचे आजार होत आहे. तसेच खड्डयांमुळे मणक्याचे आजार वाढले आहे. त्यामुळे रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी आणि शहरवासियांना दिलासा द्यावा. 


मुख्यत्वे धारणगाव रस्ता, बस स्थानकाजवळील चालू असलेले गटारीचे काम जलद गतीने करावे,  डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करावी, पाणी पुरवठा ७/८ दिवसआड आहे तो  २/३ दिवसाआड करावा आणि ठेकेदार व पालिकेने कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहे. सदर निवेदन देतेवेळी विक्रांत झावरे, प्रणव वाणी, विशाल झावरे, भूषण वडांगळे, अभिषेक कोकाटे, रितेश राउत आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत