कर्डीले साहेब, पुरावे असतील तर पोलिसांना देऊन टाका ना ...! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कर्डीले साहेब, पुरावे असतील तर पोलिसांना देऊन टाका ना ...!

 राहुरी :  वेबटीम          पत्रकार रोहिदास दातीर हत्येप्रकरणात आता पोलिसांनी कसोशीने तपास करण्याची गरज असताना त्यांनीच उलट जनतेला पुरावे आणू...

 राहुरी :  वेबटीम         


पत्रकार रोहिदास दातीर हत्येप्रकरणात आता पोलिसांनी कसोशीने तपास करण्याची गरज असताना त्यांनीच उलट जनतेला पुरावे आणून द्या, असे आवाहन केल्याने आश्चर्य वाढले आहे. दरम्यान, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी ज्या 18 एकर भूखंडचा विषय पुढे आणत त्यातून ही हत्या झाली व त्यात ना.तनपुरेचा संबंध असल्याचा आरोप केला होता, शिवाय आपल्याकडे याबाबत काही पुरावे असल्याचे देखील छाती ठोकून सांगितले होते. त्यामुळे आता पोलिसांच्या या आवाहनानंतर खरोखरच कर्डीले हे त्यांच्याकडे असलेले 'ते' पुरावे पोलिसांना सादर करणार का ? त्यांच्याकडे खरचं काही महत्वाचे पुरावे आहेत की, ही केवळ ही तनपुरेंविरोधात राजकीय स्टंटबाजी होती? याबाबत जनतेचे लक्ष लागून आहे
.                           

राहुरीच्या राजकारणात तनपुरे घराण्याने आपली प्रतिष्ठा नेहमीच जपली आहे. कुणाला सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी त्रास दिल्याचे ऐकिवात नाही. मात्र, अशातच नुकत्याच झालेल्या पत्रकार हत्येत थेट या सुसंस्कृत घराण्यातील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर कर्डीले यांनी मोठे आरोप केले आहेत. त्यात 18 एकर भूखंडाचे मूळ कारण दाखवत मुख्य आरोपी कान्हू मोरे आणि तनपुरे यांचे त्या जमिनीच्या व्यवहारात कसे संबंध आलेत, त्या जमिनीवरील सोहम प्रॉपर्टी कुणाची आहे, उताऱ्यावर नाव असलेले देशमुख हे ना. तनपुरेंचे कोण आहेत, मृत दातीर यांच्याकडे मुखत्यारपत्र कोणत्या जमिनीचे ? इत्यादी दाखवून दिले आहे, त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. मात्र, ना. तनपुरे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत, शिवाय पुरावे असले तर खुशाल पोलिसांना द्या, असे आव्हान केले, त्यानंतर दातीर कुटुंबाचे त्यांनी सांत्वन केले आहे.  एकूणच या प्रकरणाने राहुरीपासून मुंबईपर्यंत राजकारण चिघळले आहे. पोलिसांना आरोपीं कान्हू मोरे अद्याप सापडलेला नाही. त्यात भाजपने ना. तनपुरेना टार्गेट करत हे प्रकरण उचलून धरले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर देखील तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, जर कर्डीले म्हणत असतीलच तर पोलिसांनी  त्या 18 एकर जमिनीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निगडीत असलेल्या लोकांची चौकशी केली तर नक्कीच 'दूध का दूध, पाणी का पाणी..' समोर येऊन ही हत्या या भूखंडामुळे झाली की अन्य कारणाने? हे समजणार आहे.  

यात कोणी डॉक्टर असेल किंवा युवा नेते किंवा त्यांचे बगलबच्चे जरी दोषी आढळले तर त्यांच्यावर निर्भीडपणे कारवाई करावी, मात्र आरोप प्रत्यारोपांचे हे राजकारण थांबवून सत्य काय ते जनतेसमोर यावे, अशी मागणी राहुरीकर करत आहेत. अर्थात, यासाठी कर्डीले यांनी देखील पोलिसांना सहकार्य करताना त्यांच्याकडे असलेले पुरावे सादर करण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत