वळण(प्रतिनिधी) नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत वळण-पाथरे रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे....
वळण(प्रतिनिधी)
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातुन वळण-पाथरे रस्त्यासाठी १.२० किमी. रस्त्यासाठी ३४ लक्ष रुपये अंदाजपत्र असलेल्या या रस्ता डांबरीकरणास सुरुवात करण्यात आली आहे.तर त्यापुढेही एक किलोमीटर रस्ता डांबरीकरणासाठी ३० लक्ष रुपये देखील लवकरच मंजूर करण्यात येऊन २.२० किमी.रस्ताचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भ्रमणध्वनीवरून दिली आहे.राहुरी-श्रीरामपुर या दोन विधानसभा मतदारसंघाला जोडणारा हा वळण-पाथरे रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्राजक्त तनपुरे प्रचारादरम्यान या ठिकाणी आले असता ग्रामस्थांनी रस्त्याचा प्रश्नांबाबद त्यांचे लक्ष वेधले होते.निवडणूक आल्यानंतर प्रथमता रस्ताचा प्रश्न मार्गी लावील असा शब्द तनपुरेंनी दिला होता.निवडुक आल्यानंत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी देखील शब्दपूर्ती करत येथील दोन रस्तांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केला आहे.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब खुळे,बाजार समितीचे संचालक दत्तात्रय खुळे,उपसरपंच एकनाथ खुळे,अशोक कुलट,बी.आर.खुळे, विलास आढाव, प्रकाश आढाव, मनोज गोसावी, दादासाहेब कुलट,शंकर काळे, बाबासाहेब आढाव,पोलिस पाटील सोमनाथ डमाळे,फकिरचंद फुणगे, किशोर म्हस्के, धनंजय आढाव,सचिन काळे,पिनू कार्ले, जयराम काळे, भाऊराव धोंडे,अशोक गोसावी, ठेकेदार शिवराम गांगोले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ना.तनपुरेंची वळणला सव्वा कोंटींची विकासकामे
नामदार प्राजक्त तनपुरे हे मंत्री झाल्यानंतर त्यांनी वळण गावाला एकाच वर्षात सुमारे सव्वा कोटीं रूपयांची रस्त्यांची विकास कामे केली आहे. गावासह परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रांसफार्मर देखील बसून विकास विकास कामाची घोडदौड सुरु ठेवली आहे त्यामधे वळण-गणपतवाडी रस्ता डांबरीकरणासाठी २५ लक्ष रूपये,वळण-पाथरे रस्ता डांबरीकरणासाठी ३४ लक्ष रूपयांची कामे पूर्णत्वाकडे तर पुन्हा वळण-पाथरे १ किमी.साठी ३० लक्ष तर वळण-गणपतवाडी पुन्हा १ किमी.साठी ३० लक्ष रूपयांची तरतुद लवकर होणार असुन ती देखील कामे लवकर सुरू होतील.
बाळासाहेब खुळे(जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी)
खासदार सुजय विखेंकडे हि जाणार...
गावामध्ये रस्त्यांचे प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून खूप बिकट झाले आहेत.त्यामुळे प्रथमता विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी नामदार प्राजक्त तनपुरे यांनी काही रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे आता पुढील काही रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्याकडे जाणार असून स्त्याचे प्रश्न मार्गी लावावी म्हणून मागणी करणार आहोत. नामदार प्राजक्ता तनपुरे आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या दोघांवर देखील वळण गावाने मतांच्या रूपाने भरभरून प्रेम केले आहे त्यामुळे त्यांनी देखील आता या गावाकडे विकास कामाच्या दृष्टीने भरभरून प्रेम करावे अशी मागणी आम्ही सर्व ग्रामस्थांच्यावतीने यांच्याकडे करणार आहोत.
दत्तात्रय खुळे(संचालक, बाजार समिती)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत