राहुरी नर्सिंग होममध्ये कोरोना सेंटर नसणे हे विखेंचे अपयश ..! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी नर्सिंग होममध्ये कोरोना सेंटर नसणे हे विखेंचे अपयश ..!

 राहुरी : प्रतिनिधी        जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना प्रत्येक तालुक्यात राजकीय नेते पुढे येऊन ऑक्सिजनयुक्त कोव्हिडं सेंटर सुरू...

 राहुरी : प्रतिनिधी   


   
जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना प्रत्येक तालुक्यात राजकीय नेते पुढे येऊन ऑक्सिजनयुक्त कोव्हिडं सेंटर सुरू आहेत. मात्र, खासदार डॉ सुजय विखे यांनी दक्षिणेत विशेष लक्ष केंद्रित केले असताना राहुरीचा त्यांना विसर पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, राहुरीत नर्सिंग होम येथे भव्य कोव्हिडं सेंटर होऊ शकते, तेथे सर्व सुविधा आहेत, डॉक्टर आहेत ,तरीही कारखान्याचे संचालक मंडळ उदासीन असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

 राहुरी कारखान्याच्या सभासदांनी उभारलेल नर्सिंग होममध्ये पाणी आहे, कॉट आहेत, नर्स आहेत, डॉक्टर आहेत, स्वछता गृह आहे, येथे 100 बेडचे कोरोना सेंटर का सुरू करत नाही, शिवाय इंजिनिरिंग कॉलेजची इमारत देखील कोव्हिडं सेंटरसाठी उपयुक्त ठरत आहे. तेथेही रुग्णावर उपचार होऊ शकतात, त्यामुळे राहुरीतील रुग्णांना बेडसाठी नगर-पुण्याला धावपळ करावी लागणार नाही,   एकीकडे खासदार विखे दिल्लीला जाऊन 10 हजार रेमडेसीविर आणतात, तर दुसरीकडे त्यांच्या लोकसभा मतदार संघातील राहुरी  येथे त्यांच्या ताब्यातील कारखान्याकडे नर्सिंग होम असताना देखील तेथे कोव्हिडं सेंटर सुरू करता येत नसल्याने ही मोठी शोकांतिका असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. राहुरीत रुग्ण वाढत आहे, दररोज बेड अभावी लोक मरत आहेत, मात्र कारखान्याच्या संचालक मंडळाला येथील नर्सिंग होम व इंजिनिअरिंग कोलेजमध्ये कोव्हिडं सेंटर सुरू करण्याची देव  बुद्धी का देत नाही, असा सवालही जनतेतून होत आहे…                                                                      
 
                                                        राहुरी तालुक्यात सुसज कोव्हिडं सेंटर गरजेचे आहे. खा. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखालील राहुरी कारखान्याच्या नर्सिंग होममध्ये 100 बेडचे कोव्हिडं सेंटर सुरू होऊ शकते. येथे तशा सर्व सुविधा असताना संचालक मंडळ मात्र निरुत्साही दिसत आहे. यातून खा.विखे पाटलांचे   व त्यांच्या संचालक मंडळाचे    अपयश आहे. त्यांनी तत्काळ येथे कोव्हिडं सेंटर सुरू करणे जनतेसाठी अपेक्षित आहे. युवानेते अमृत पा. धुमाळ (  स्व.रामदास पा. धुमाळ विचारमंच अध्यक्ष)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत