सात्रळ : प्रतिनिधी तालुका प्रशासनाच्या आदेश्यानुसार सात्रळ, सोनगाव, धानोरे या गावामध्ये येत्या सात दिवसासाठी पूर्णपणे लॉक डाऊन राह...
सात्रळ : प्रतिनिधी
तालुका प्रशासनाच्या आदेश्यानुसार सात्रळ, सोनगाव, धानोरे या गावामध्ये येत्या सात दिवसासाठी पूर्णपणे लॉक डाऊन राहणार आहे. तालुक्यातील कोरोना वाढत्या प्रादुर्भावमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून सत्राल, सोनगाव, धानोरे येथील अत्यावशक सेवेतील फक्त मेडिकल दुकाने व दवाखानेच चालू राहतील, इतर भाजिपाला, किराणा तसेच या पूर्वीच्या आदेशानुसार चालू ठेवण्याची परवानगी असलेले सर्व दुकाने नवीन आदेशानुसार येत्या सात दिवस बंद राहणार आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने जाहीर केले आहे.
शासन निर्णयाची अंमलबजावणी साठी भरारी पथकातील मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी खरमाळे, पंडित तसेच सात्रळ चे सरपंच सतिष ताठे, उपसरपंच तांबोळी, सोनगावचे सरपंच अनिल अनाप, उपसरपंच अंत्रे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी रवी शेजवळ, डुकरे, सुभाष शिंदे, सोनगाव ग्रामपंचायत कर्मचारी प्रयत्नशील असून पेठेत व परिसरात फिरून ग्रामस्थांना शासन निर्णयाची माहिती तसेच मास्क चा वापर, विनाकारण फिरू नकाचे आव्हान करताना दिसत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत