रक्तदान,प्लाझ्मा दान करून वाढदिवस साजरा करा: पिचड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रक्तदान,प्लाझ्मा दान करून वाढदिवस साजरा करा: पिचड

   अकोले : प्रतिनिधी             आज सर्वत्र कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वानी रक्तदान करून ,प्लाझ्मा दान करून,कोरोनामुळे मृत्यू...

  

अकोले : प्रतिनिधी  

         


आज सर्वत्र कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वानी रक्तदान करून ,प्लाझ्मा दान करून,कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व घराचा आधार त्या कुटुंबाना मदत करा,आरोग्य विषयक योगदान देऊन  माझा  वाढदिवस साजरा करावा असे आवाहन भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री  वैभवराव पिचड यांनी केले.

     ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण केंद्रीय मंत्री भारतीयांसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत,  आणि राज्यात देखील आमचे सर्व जेष्ठ वरिष्ठ नेते तुमच्या माझ्यासाठी लढा देत आहेत त्याला सकारात्मक आणि रचनात्मक प्रतिसाद देण प्रत्येकाच प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे, आणि ते आपण सर्वांनी पार पाडल पाहीजे. 

   माझ्या उद्या दि.२७ एप्रिल रोजीच्या वाढदिवसाला कोणीही कोठेही शुभेच्छा देणारे बॅनर लावु नका,  हार तुरे देऊ नका,  आणि आनंद सोहळे तर अजिबात आयोजित करु नका.

       राष्ट्र कोरोणाचा मुकाबला करत असताना आपण संवेदना हरवुन वैयक्तिक आनंदोत्सव साजरा करणे आपल्या मराठी संस्कृती आणि संस्कारांना शोभणारे नाही. 

     उलट आपण माझ्यासाठी काही करु शकत असाल तर रक्तदान करा,  प्लाझ्मा दान करा,  जनतेला रोग प्रतिबंधात्मक औषधे द्या,  आरोग्य जनजागृती करा,ज्या घराचे मुख्य आधार असलेले कोरोणाने मृत्युमुखी पडले त्यांच्या  कुटुंबियांना भरभरून मदत करा,  आपल्या आजूबाजूला ज्या गोरगरीबांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे. त्यांना यथाशक्ती मदत करा. एवढ केल तरी माझा वाढदिवस भव्य दिव्य साजरा केल्याचा आनंद मला प्राप्त होईल. 

     तेव्हा सर्वांनी अनावश्यक खर्च टाळुन माझ्या आवाहनाचा   विचार करून आरोग्य विषयक योगदान द्यावे आणि विधायक कार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माझ्यावर असेच कायम आपले प्रेम राहु द्या करतो  असे म्हणत त्यांनी सर्वांच्या खुशालीसाठी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे.

      अत्यावश्यक कामा शिवाय घराबाहेर पडू नका,  तोंडाला मास्क लावा, सामाजिक सुरक्षित अंतर पाळा, वेळोवेळी हात धुवत रहा, सेनिटायझर वापरा, आणि सुरक्षित रहा ...

 नियम पाळा आणि कोरोणा टाळा,

   असे आवाहन अनुसूचित जमाती मोर्चा, भारत, नवी दिल्ली चे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत