नेवासा : प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील पत्रकार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य कोरोना संसर्गीत झाल्यास त्यांना तालुक्यातील कोविड केअर स...
नेवासा : प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील पत्रकार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य कोरोना संसर्गीत झाल्यास त्यांना तालुक्यातील कोविड केअर सेंटर मध्ये प्राधान्याने बेड उपलब्ध करून देणे , ऑक्सीजनची व्यवस्था करणे तसेच 18 वर्ष वया पुढील सर्व पत्रकारांचे तातडीने कोरोना प्रतीबंधक लसिकरण करण्यात यावे अशी मागणी नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.सुनील गर्जे यांनी केली आहे.
नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे जेष्ठ मार्गदर्शक प्रदास देशपांडे, नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.सुनील गर्जे,जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव सुखदेव फुलारी, पत्रकार नामदेव शिंदे यांचे शिष्टमंडळाने सोमवार दि.26 एप्रिल रोजी भेंडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपजिल्हाधिकारी तथा नगर विभागाचे प्रांत गणेश पवार,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,वैद्यकीय अधिकारी डॉ.रामेश्वर शिंदे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
या निवेदनात, नेवासा तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थीतीमध्ये कोरोना रूग्णाना बेड उपलब्ध होणे, ऑक्सीजन सुविधा मिळणे जिकरीचे होत आहे. पञकार हा जनता व प्रशासन यांचेमधील दुव्याचे काम करित आहे. आरोग्य , पोलीस, सफाई कामगार, प्रशासकिय कर्मचारी यांचेप्रमाणेच पत्रकार सुध्दा आपला जिव धोक्यात घालुन फ्रंटलाईन वर्कर म्हणुन काम करत आहे. अशा परिस्थीतीत पञकरांचे कोरोना बाधीत होण्याचे प्रमाण ही वाढत आहे . तरी आपणास विनंती आहे की नेवासा तालुक्यातील पत्रकार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य कोरोना संसर्गीत झाल्यास त्यांना तालुक्यातील कोविड केअर सेंटर मध्ये प्राधान्याने बेड उपलब्ध करून देणे , ऑक्सीजनची व्यवस्था करणे तसेच 18 वर्ष वया पुढील सर्व पत्रकारांचे तातडीने कोरोना प्रतीबंधक लसिकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत