ऑक्सिजन निर्मिती प्लँटबाबत ना.तनपुरेंनी घेतला आढावा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ऑक्सिजन निर्मिती प्लँटबाबत ना.तनपुरेंनी घेतला आढावा

 मुंबई : वेबटीम   औष्णिक वीज महानिर्मितीच्या प्लॅन्ट मधून ऑक्सिजन निर्मितीच्या प्रयत्नांचा नामदार प्राजक्त तनपुरे यांनी आज आढावा घेतला. दरम्...

 मुंबई : वेबटीम


 
औष्णिक वीज महानिर्मितीच्या प्लॅन्ट मधून ऑक्सिजन निर्मितीच्या प्रयत्नांचा नामदार प्राजक्त तनपुरे यांनी आज आढावा घेतला. दरम्यान, काही तांत्रिक अडचणींमुळे या प्रयत्नांना वेळ लागू शकतो. परंतु युद्धपातळीवर प्रयत्न करून यातून मार्ग काढण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ना. नितीन राऊत हे देखील या प्रक्रियेत जातीने लक्ष ठेवून आहेत. या अडचणीच्या काळात जे काही करणे शक्य होईल ते प्रयत्न सुरू आहेत, असेही ना. तनपुरे म्हणाले.
 

औष्णिक वीज केंद्रातून ऑक्सजिन निर्मितीची संकल्पना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुढे आणली आहे. सरकारने या प्रयोगाला प्रतिसाद देत या कामाला गती दिली आहे. त्या धर्तीवर काही ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे. मंत्री तनपुरे हे जातीने यावर लक्ष केंद्रित करून आहेत, त्यांच्याकडून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहनही केले जात आहे. आज मंत्री तनपुरे यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन याबाबत आढावा घेतला. त्यात काही तांत्रिक अडचणी समोर आल्याने या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली गेली, मात्र मंत्री तनपुरे यांनी हार न मानता यातून लवकर काहीतरी मार्ग काढण्याचे सुचवले आहे. त्यामुळे ही अडचण दूर झाली तर अल्पावधीतच ऑक्सिजन निर्मिती सुरू होऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत