श्रीरामपूर : वेबटीम श्रीरामपुरातील एका रुण्गाला अर्जंट रेमडेसीवीरची आवश्यकता असल्याने रुण्गाचे नातेवाईक रेमडेसीवीर मिळवण्यासाठी मोठी मेहनत ...
श्रीरामपूर : वेबटीम
श्रीरामपुरातील एका रुण्गाला अर्जंट रेमडेसीवीरची आवश्यकता असल्याने रुण्गाचे नातेवाईक रेमडेसीवीर मिळवण्यासाठी मोठी मेहनत घेत होते. त्या दरम्यान रुण्गाच्या नातेवाईकाला रईस अफजल शेख, वय-२०,राहणार-मातापुर ता.श्रीरामपूर याने संपर्क करुन रेमडेसीवीर देतो असे सांगितले.परंतु पेशंटच्या नातेवाईकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना सांगितल.त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दि.१८ रोजी सायंकाळ ०५:०० वा रईस शेख याला ओव्हर ब्रीज जवळ,श्रीरामपूर येथे ताब्यात घेतले.त्याच्याकडुन बनावट रेमडेसीवीर इंजेक्शन पोलिसांनी हस्तगत केले.
पोलिसांनी रईस शेखकडे अधिक विचारपुस केली तेव्हा शेखने सांगितले की,डाॅक्टरांनी वापरुन कचराडब्यात फेकून दिलेल्या रिकाम्या रेमडीसीवीर इंजेक्शन मध्ये तो सलाईन मधील पाणी भरुन विकायचा. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रईस शेखने असे किती बनावट इंजेक्शन अडचणीत असलेल्या कोरोना पेशंट च्या नातेवाईकांना विकले ? यामुळे कोणी कोरोना पेशंट दगावले का? याचा तपास श्रीरामपुर पोलीस करत आहे. सुदैवाने श्रीरामपुरातला या पेशंट च्या नातेवाईकाला पोलिसांमुळे ही बाब कळाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत