राहूरी(वेबटिम) राहुरी येथील आरटीआय कार्यकर्ते व पत्रकार रोहिदास दातीर यांचे खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हु मोरे यास आज न्यायालयात ह...
राहुरी येथील आरटीआय कार्यकर्ते व पत्रकार रोहिदास दातीर यांचे खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हु मोरे यास आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडने अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी (वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी) व तोफिक मुक्तार शेख( वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी) या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती
तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हु गंगाराम मोरे ( वय 46 , रा.वांबोरी) यास नेवासा येथे नगर औरंगाबाद जाणाऱ्या रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त येथून डिवायसीपी संदीप मिटके व त्यांचे पथकाने ताब्यात घेतले होते.
आज (सोमवार) न्यायालयात हजर केले असता 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. श्री शिंपी व पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी जोरदार युक्तिवाद केला . न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दहा दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. आरोपीच्या बाजूने ॲड.तोडमल व अँड.सांगळे यांनी काम पाहिले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत