उंबरेत राजकीय भूकंप ; संजय अडसुरे यांचा राजीनामा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरेत राजकीय भूकंप ; संजय अडसुरे यांचा राजीनामा

 उंबरे : वेबटीम      उंबरे ग्रामपंचायतीचे प्रभाग क्रमांक पाचचे विद्यमान सदस्य संजय नानाभाऊ अडसुरे  यांनी आज आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा द...

 उंबरे : वेबटीम     

उंबरे ग्रामपंचायतीचे प्रभाग क्रमांक पाचचे विद्यमान सदस्य संजय नानाभाऊ अडसुरे  यांनी आज आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सत्ताधारी मंडळाचे श्रेष्ठी हा राजीनामा मंजूर करू शकत नाही, कारण पोटनिवडणूक झाली तर निकाल त्यांना माहिती आहे, असे एका विरोधी मंडळाच्या सदस्याने सांगितले. 

 उंबरे ग्रामपंचायत निवडणुकीत गणराज शेतकरी मंडळाला 9 जागा तर आदिनाथ सेवा मंडळाला 6 जागा मिळाल्या होत्या. दरम्यान, सरपंच पद हे अनुसूचित जमातीला गेल्याने ही जागा आदिनाथ सेवा मंडळाकडे असल्याने सरपंच त्यांचा झाला तर बहुमत मिळूनही गणराज मंडळ विरोधी बाकावर बसले.

आता सरपंच आदिनाथ सेवा मंडळ तर उपसरपंच गणराज मंडळाचा आहे. मात्र सत्ताधारी गटातील अर्थात आदिनाथ सेवा मंडळाचे विद्यमान सदस्य संजय अडसुरे यांनी आज सकाळी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या स्वाभिमानी विचारसरणीला काही गोष्टी पटणाऱ्या नाहीत, शिवाय आपल्यावर कोणताही डाग नको, आणि कोणत्या चुकीच्या गोष्टीला समर्थन नको, म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पक्ष श्रेष्ठी हा राजीनामा मंजूर करणार नाहीत, कारण अगोदरच त्यांच्याकडे संख्याबळ कमी आहे, त्यात हा राजीनामा मंजूर केला तर आदिनाथ सेवा मंडळाकडे केवळ 5 सदस्य राहतील त्यामुळे ही चूक ते करणार नाहीत आणि पोटनिवडणूक झाली तर जनता त्यांना पुन्हा नाकारले अशी मनात भीती आसल्याने  हा राजीनामा मंजूर होणार नाही, अशी चर्चा गावात सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत