राहुरीचे डॉ.अण्णासाहेब गागरे यांचे अल्पश्या आजाराने निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीचे डॉ.अण्णासाहेब गागरे यांचे अल्पश्या आजाराने निधन

राहुरी(प्रतिनिधी) राहुरीचे डॉ अण्णासाहेब गागरे यांचे आज दि. १९ एप्रिल रोजी पहाटे अल्पशा आजाराने अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.   ...

राहुरी(प्रतिनिधी)

राहुरीचे डॉ अण्णासाहेब गागरे यांचे आज दि. १९ एप्रिल रोजी पहाटे अल्पशा आजाराने अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. 

     अत्यंत साधी राहणी,  मनमिळावू स्वभाव आणि राहुरी येथील डॉ गागरे हॉस्पिटल चे माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णाला पैसे नसले तरी तात्काळ वैद्यकीय  मदत करण्यासाठी ते राहुरी परिसरात सर्वांना सुपरिचित होते, तसेच त्यांनी अत्यंत आर्थिक हलाकीच्या परिस्थितीत शार्दूल आणि शाल्मली या दोन मुलांच्या रूपाने बुद्धिबळ क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशाला दोन दिग्गज ग्रँडमास्टर खेळाडू दिले. त्यांच्या या योगदानामुळे राहुरी चे नाव जगाच्या नकाशावर झळकले. त्यामुळे डॉ गागरे यांचे आकस्मिक जाण्याने  राहुरीकरांसाठी मोठी हानी झाली असून देशातील बुद्धिबळ खेळातील तमाम खेळाडू मध्ये कधीही भरून न येणारी पोकळी निर्मान झाली आहे.  डॉ गागरे यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. 

     राहुरी तालुका मेडिकल असोसिएशन, राहुरी तालुका बुद्धिबळ असोसिएशन, नॅशनल ऍडव्हेंचर फौंडेशन, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राहुरी कारखान्याचे माजी संचालक कारभारी डौले यांच्यासह राहुरीतील सर्व मित्र परिवाराने  डॉ अण्णासाहेब गागरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत