राजूर येथे रक्तदानास उस्फुर्त प्रतिसाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राजूर येथे रक्तदानास उस्फुर्त प्रतिसाद

     राजूर :  प्रतिनिधी          श्रीराम नवमीचे औचित्य साधून सामाजिक भावनेतून कोरोनाच्या या महामारीत रक्ताची गरज लक्षात घेऊन राजूर येथील तरु...

  

  राजूर :  प्रतिनिधी 


       

श्रीराम नवमीचे औचित्य साधून सामाजिक भावनेतून कोरोनाच्या या महामारीत रक्ताची गरज लक्षात घेऊन राजूर येथील तरुण युवकांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते.या रक्तदान शिबिरात एकूण 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्त्यव्य पार पाडले
.

    


कोरोना सारख्या महामारीचा उद्रेक तर दुसरीकडे रक्ताचा तुटवडा आणि त्यात कोरोना काळात २४ तास लागलेली ड्युटी,तरीही कर्तव्य बजावित असताना राजूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस कॉन्स्टेबल दिलीप डगळे यांनी रक्तदान करून माणुसकीचे दर्शन  घडवले.

     यया रक्तदान शिबिरासाठी गावचे तरुण युवक पुष्कर सोनार,ऋषिकेश कानकाटे,मंगेश चोथवे,तुषार लहामगे या तरुण युवकांनी पुढाकार घेत रक्तदान शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. यासाठी संगमनेर येथील अर्पण ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले.

     यावेळी राजूर पोलीस स्टेशन चे स. पो. नि नरेंद्र साबळे सरपंच गणपत देशमुख उपसरपंच गोकुळ कानकाटे, भास्कर येलमामे, संतोष बनसोडे, विजू लहामगे, हर्षल सोनार, संतोष मुतडक यांचे उपस्थित मित्र होते.

    पुन्हा एकदा राजूरकर एकजूट होऊन एक खारीचा वाटा म्हणून रक्तदानास एकवटल्याचे दिसून आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत