राहुरी/गोविंद फुणगे राहुरी शहरातील आझाद चौक परिसरामध्ये असलेल्या देशी दारू दुकानातुन दारू विक्री होत असल्याने राहुरी पोलिसांनी या ठिक...
राहुरी/गोविंद फुणगे
राहुरी शहरातील आझाद चौक परिसरामध्ये असलेल्या देशी दारू दुकानातुन दारू विक्री होत असल्याने राहुरी पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत सदर दुकानावर छापा टाकला.पोलिसांना पाहाताच ग्राहकांनी धुम ठोकली माञ दुकानावर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क ला अहवाल पाठवणार असल्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान राहुरी शहरात पो.नि.नंदकुमार दुधाळ सह पो.काॅ.अदिनाथ पाखरे, किरण ठोंबरे,शिवाजी खरात आदिंच्या पथकाची पोलिसांची गस्त सुरू असताना दारू दुकानाबाहेर काही ग्राहकांची गर्दी असल्याचे निदर्शनास आले माञ पोलिस गाडी पाहताच सदर ग्राहकांनी या ठिकाणाहुन धुम ठोकली माञ पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पोलिसी खाक्या दाखवत माजी नगरसेवकाला चांगलेच खडे बोल सुनावले.
सध्याच्या काळात गोरगरिबांना वैद्यकीय मदत लोकप्रतिनिधींनी केली पाहिजे माञ तुम्ही तर दारू विक्रीतुन पैसा कमावता हे योग्य नाही अस म्हणत दुधाळ यांनी दारू दुकानदारास चांगलेच झापले. जर कुनी शहरात व तालुक्यात हात भट्टी दारू विक्री केली तर याद राखा जेथे दारू विक्री होत असेल तेथील पोलिस कर्मचा-याला जबाबदार धरले जाईल असा सज्जड इशाराही यावेळी दुधाळ यांनी दिला. तर या देशी दारू दुकानदाराचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठवणार असुन कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत