अहमदनगर : ,प्रतिनिधी खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून 10 हजार इंजेक्शन आणल्याचा दावा संपूर्णपणे संशयास्पद आ...
अहमदनगर : ,प्रतिनिधी
खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून 10 हजार इंजेक्शन आणल्याचा दावा संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ नागरिकांची थट्टा करणारे आहेत. एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्समध्ये काय होत ते स्पष्ठ करावं, आणि जर रेमडेसीविर असतील तर ते कुणाला वाटले किंवा सामान्य जनतेला ते कुठं मिळतील ? याची माहिती द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
दोन दिवसांपूर्वी खासदार डॉ सुजय विखे यांनी दिल्लीहुन रेमडेसीविर इंजेक्शन बॉक्स हवाइमार्गाने आपल्यासोबत महाराष्ट्रात आणले होते. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. दरम्यान, या इंजेक्शनमुळे नगरची ओरड कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, खासदार विखे यांनी 10 हजार इंजेक्शन आणल्याचे कार्यकर्ते सांगत असताना सर्वसामान्य जनतेला मात्र इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांची वणवण सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुजय विखेंच्या व्हिडीओबाबत त्यांनी संशय व्यक्त करतानाच विखेंनी बॉक्समध्ये काय होत, ते सांगावे जर इंजेक्शन असेल तर ते नेमकं कुणाला वाटलं किंवा जनतेला ते कुठं भेटेल, याची माहिती द्यावी, असेही आवाहन केले आहे. दरम्यान, खा विखे यांनी खरचं इंजेक्शन आणले असतील तर ते रुग्णांना का दिले जात नाही, इंजेक्शन नेमके कुठं मिळणार आहेत, त्याची किंमत काय असेल, की विखेनी ते इंजेक्शन फकत त्यांच्या संस्थेतील रुग्णांसाठीच आणले का ? असे अनेक सवाल या निमित्ताने जनतेमधून पुढे येत आहे. नक्कीच खासदार विखे पाटील हे इंजेक्शन कुठं मिळतील सांगतील, त्याच्या वाटपाचे देखील उत्तम नियोजन करतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, खासदार डॉ श्री सुजय दादा विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात दिल्लीतुन विमानाने रेमडिसिव्हर आणले, त्यामुळेच हॉस्पिटलमध्ये भरपूर लोकांचे प्राण वाचले त्याबद्दल दादा आपले मनापासून धन्यवाद , असे कार्यकर्त्यांमधून बोललं जातं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत