शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू ; अकोलेत शोककळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू ; अकोलेत शोककळा

 अकोले: प्रतिनिधी  शेततळ्यात बुडून एका शेतकऱ्याचा व एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गर्दनी शिवारात वीरगाव घाटाजवळ घडली.काही द...

 अकोले: प्रतिनिधी 


शेततळ्यात बुडून एका शेतकऱ्याचा व एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गर्दनी शिवारात वीरगाव घाटाजवळ घडली.काही दिवसांपूर्वी वीरगाव येथेही बाप- लेकीचा शेततळ्यात  बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.त्या पाठोपाठ ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बबन भिकाजी नाईकवाडी (वय-50,रा.गर्दनी,ता.अकोले) व आरुष राहुल वामन (वय 7 वर्ष,रा.कोल्हेवाडी,ता.संगमनेर)असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. यातील  मयत मुलगा आरुष हा  बबन नाईकवाडी यांच्या साडूच्या मुलीचा मुलगा आहे. नात्याने नातू हा आजोबा बबन  नाईकवाडी यांच्याकडे लॉकडाऊनमुळे शाळेला सुट्टी असल्यामुळे आला होता. नाईकवाडी यांचे गर्दनी शिवारात डोंगराच्या कडेला शेत आहे.तेथे कांदा काढण्याचे काम सुरू होते.त्यावेळी  आरुष हा लगतच असलेल्या भाऊसाहेब दामोदर नाईकवाडी यांच्या मालकीच्या शेततळ्यात  गुरुवारी दुपारी 4 ते 4.15 वाजेच्या सुमारास आंघोळीसाठी गेला होता.आरुष हा पाण्यात बुडत असल्याचे पाहून बबन नाईकवाडी हे त्याला वाचवण्यासाठी शेततळ्यात उतरले.या घटनेत दोघांचाही दुदैवी मृत्यू झाला.                                                      डोंगराच्याकडेला असणाऱ्या शेततळ्यात ही घटना घडल्याने लवकर कुणाच्याही लक्षात आले नाही.सायं.साडे पाच वाजेच्या वेळेस भाऊसाहेब नाईकवाडी हे शेततळ्याकडे गेले असता त्यांना हे दोघे शेततळ्यात बुडाल्याचे दिसले.नंतर त्या दोघांचे ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री बबन नाईकवाडी यांचे वर गर्दनी येथे तर आरुष वर कोल्हेवाडी या त्याच्या गावी शोकाकुल वातावरनात अंत्यसंस्कार करण्यात आले.किशोर भास्कर नाईकवाडी यांच्या खबरी वरून अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत