राहूरी फॅक्टरी(वेबटीम) माणसाला कोणत्याही गोष्टीची आवड असली की त्यासाठी सवड होते किंबहुना ती गोष्ट करण्यासाठी तो माणूस धडपडत राहतो.याचा प्रत्...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
माणसाला कोणत्याही गोष्टीची आवड असली की त्यासाठी सवड होते किंबहुना ती गोष्ट करण्यासाठी तो माणूस धडपडत राहतो.याचा प्रत्यय प्रत्यक्षात राहुरी फॅक्टरी-देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांना आला आहे.
राहुरी फॅक्टरी हा तसा देवळाली प्रवरा नगरपरिषदेचाच भाग.आदिनाथ कराळे हे प्रभाग क्रमांक आठचे नगरसेवक आहेत.त्यांचे शिवबा प्रतिष्ठान हे नेहमीच नागरिकांच्या सुख दुखात सहभागी असतात,अनेक सामाजिक उपक्रम करत असताना मागील वर्षी कोविडच्या काळात लोकांना जेवण देणे,नगर-पुणे- मुंबईहुन औषध आणून देने,परप्रांतीयांना इच्छितस्थळी पोहचवणे,रुग्णाला प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहचवणे , फवारणी करणे असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले.
यावर्षीही कोरोनाचे संकट आले व हळूहळू त्याने उग्र रूप धारण केले आहे. समाजप्रति आपली बांधीलकी असल्याने आदिनाथ कराळे यांनी नामदार प्राजक्त तनपुरे यांचे सहकार्य घेऊन इतर काही संस्थांच्या मदतीने कणगर येथे हायस्कूल शाळेत ५०खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले.मात्र सध्या सर्वत्र कोविड रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत आहे,.ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड पाहून कराळे यांनी स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या आदिनाथ सर्व्हिस सेंटरचे कोविड सेंटर मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. या साठी तातडीने ऑक्सिजन लाईन टाकणे, लाईट फिटिंग, काही विकत तर काही मित्र परिवाराकडून सुमारे चाळीस ऑक्सिजन सिलेंडर,गाद्या, पलंग व सर्वच आवश्यक त्या साहित्याची जुळवाजुळव करून २०बेडची क्षमता असणारे वसेंटर सज्ज केले आहे.नव्याने आलेल्या काही बाबीची पूर्तता करून एक दोन दिवसात हे सेंटर सुरू होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत