अकोले : प्रतिनिधी वनसंरक्षण समितीचा अध्यक्ष या नात्याने परिसरातील जंगलात लागलेले वनवे विझवण्यासाठी कर्तव्यात कसूर न करणारा अवलिया म्ह...
अकोले : प्रतिनिधी
वनसंरक्षण समितीचा अध्यक्ष या नात्याने परिसरातील जंगलात लागलेले वनवे विझवण्यासाठी कर्तव्यात कसूर न करणारा अवलिया म्हणजे बाळासाहेब लोहकरे.
वनविभागाच्या राखीव जंगलाचे संरक्षण करण्यासाठी आपापल्या विभागात वॉचमनच्या नियुक्त्या केल्या आहेत. परंतु ठरलेल्या कार्यालयीन वेळानंतर जंगलात लागलेले वनवे अथवा इतर घटनांची तात्काळ दखल घेतली जात नाही कारण त्या ठिकाणी नियुक्ती केलेले वॉचमन हे बाहेर गावचे असतात वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचेपर्यंत मोठे नुकसान झालेले असते.म्हणुन वनसंरक्षण समितीची गाव पातळीवर स्थापना करण्यात आली. गावातील व्यक्तिंची समिती वर निवड करण्यात आली.जेणे करून गाव शिवारात एखादी घटना घडली तर तात्काळ घटना स्थळी पोहचता येईल व नुकसान टाळता येऊ शकते. वांजुळशेत ता.अकोले येथे गेल्या सहा वर्षापासून वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब लोहकरे हे काम करत आहे. तेव्हा पासून जर जंगलात वनवे लागण्याची एखादी घटना घडली तर तात्काळ प्रशासनाला कळविणे, सबंधीत यंत्रणा उपलब्ध करणे व आग आटोक्यात आणण्यासाठी बाळासाहेब स्वतः आपले कर्तव्य बजावत असतो. अनेक वेळा रात्री अपरात्री वनवे लागण्याच्या घटना घडल्या परंतु त्याने कधीही आपल्या कर्तव्यात कसूर होऊ दिली नाही. दिलेले काम अत्यंत विश्वासाने सांभाळुन कर्तव्य बजावले आहे. गेल्या सहा वर्षाच्या कार्यकाळात जवळपास पंधरा वेळा या परिसरात वनवा लागण्याच्या घटना घडल्या परंतु प्रत्येक वेळी आपले सहकारी यांच्या मदतीने प्रयत्न केले.
काल परवाची घटना वांजुळशेत येथील वनविभागाच्या मालकीच्या जंगलात बांबुची लागवड केलेल्या जंगलाला आग लागली. त्यावेळी बाळासाहेब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला.वनविभागाचे अधिकारी यांना घटनेची माहीती देउन स्वतः आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर वॉचमन म्हणुन नियुक्त असलेले आबा कोंडार यांनाही घटनास्थळी बोलवून आग विझवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली.अनेक वेळा या परिसरात वनवा लागण्याच्या घटना घडत असतात.त्यावेळी मी व वॉचमन स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहुन आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असतो कधी कधी जास्त हवा असेल तर आगीचे लोळ अत्यंत वेगाने पसरत असतात. त्यावेळी जीव धोक्यात घालून मी माझे कर्तव्य बजावत असतो. रात्री अपरात्री माहीती मिळाली तर मी तात्काळ तिथे जाऊन कर्तव्य बजावत असतो असे त्याने सांगितले. खर तर असे जीवाची बाजी लावुन जीव धोक्यात घालुन प्रामाणिकपणे काम करणारे जे असतात त्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने काही तरतुद करणे किंवा त्यांच्यासाठी सुरक्षा कवच निर्माण करून देणे गरजेचे आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत