राहाता : प्रतिनिधी आज राहाता तालुक्यातील इतर गावाच्या तुलनेत आपल्या गावाची लोकसंख्या जवळपास पंचविस हजार पर्यत असुन तालुक्यातील सर्वात मोठे...
राहाता : प्रतिनिधी
आज राहाता तालुक्यातील इतर गावाच्या तुलनेत आपल्या गावाची लोकसंख्या जवळपास पंचविस हजार पर्यत असुन तालुक्यातील सर्वात मोठे ग्रामीण गाव लोणी खुर्द आहे. आज गावात कोव्हिड बाधित पाच रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आहे. इतर गावाच्या कोव्हिड बाधित रुग्णांच्या तुलनेत आपले गाव आज थोडे सुरक्षित वाटते. परंतु आपल्याला सर्वाना सतर्क राहून स्वतःची व कुटुबांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
आपल्या लोणी खुर्द ग्रामपंचायत च्या माध्यमातून संपुर्ण गावात सोडियम डायप्रोक्लोराइड ची फवारणी सुरु आहे. गावामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व त्यांनी घालून दिलेल्या निर्बंधाप्रमाने लाॅकडाऊन सुरु आहे. नागरिकांनी तंतोतंत लाॅकडाऊन पाळावे म्हणुन आपन जनजागृती करत आहे.
नागरिकांना काही नागरी सुविधा संदर्भात काही आडचणी असल्यास ग्रामपंचायत कार्यालयात येण्यापेक्षा मला किंवा ग्रामविकास आधीकारी तसेज त्या परिसरातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना फोन द्वारे माहीती दिली तरी आपल्या आडीआडचणी वर मात केली जाईल. तरी अजूनही कोव्हिड चे थैमान कमी झालेले नसुन परिस्थिती खुपचं गंभीर होत असुन सर्व नागरिकांनी थोडे दिवस कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणे टाळावे. आत्यावशक कामाशिवाय घराबाहेर पडु नये. कोव्हिड चे सर्व नियम पाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच जनार्दन घोगरे पाटील यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत