अकोले : प्रतिनिधी सध्याच्या परिस्थितीत अकोले तालुक्याची करो नाची स्थिती अत्यंत भयावह असून या काळात लोकांना आधाराची, मदतीची गरज आह...
अकोले : प्रतिनिधी
सध्याच्या परिस्थितीत अकोले तालुक्याची करो नाची स्थिती अत्यंत भयावह असून या काळात लोकांना आधाराची, मदतीची गरज आहे. संगमनेर -अकोले असा वाद न करता व चुकीची प्रथा न पाडता सर्वानी एक जुटीने एकत्र राहून या परिस्थितीचा सामना करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच यातून मार्ग काढण्याऐवजी भांडत आहे हे अत्यन्त चुकीचे आहे . असे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी म्हटले आहे .
राजूर येथे निवास स्थानी ते पत्रकारांशी ते बोलत होते . ते पुढे म्हणाले कि , करोना ह्रा जागतिक महामारीने संपूर्ण जगाला हैराण केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेला अकोलेकरांनी मोठया धिराने तोंड दिले. सर्व नियमांचे कोटेकोर पालन केले.करोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा गंभीर आहे. गुणाकाराने वाढणार संसर्ग आपल्या सर्वांना मोठया धैर्याने- आत्मविश्वासाने थोपवायचा आहे. अत्यंत महत्वाचे काम असले तरच घरा बाहेर पडा.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा 2 मे रोजी स्मृतिदिन असून या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जेल मध्ये कोणताही कार्यक्रम होणार नाही,तसेच सर्वानी आपल्या घरातच साध्या पध्दतीने हा स्मृतिदिन साजरा करावा,कोणताही सार्वजनिक समारंभ करू नये असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले.
करोनाला नकारात्मक दृष्टीने न बघता व गांभीर्याने घेवून छोटी - छोटी वाटणारी लक्षणे तातडीने डॉक्टरांना दाखवा व त्यांचा सल्ला घ्या.वयोवृध्द व ज्यांना जूने आजार आहेत अशांनी करोना जास्त गांभीर्याने घ्या व घरातल्या मंडळीनी त्यांच्याकडे जास्त लक्ष दया. या महामारीच्या काळात जास्तीत जास्त सकारात्मक विचार करा, सोशल मिडीयावर पोस्ट करतांना खुप विचारांती पोस्ट करावी की जेणे करुन त्यातून भिती निर्माण होणार नाही. रुग्णांना समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा - आधार मिळेल असेच आपले वागणे असावे.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-3977462161011594 अकोले तालुका हा अत्यंत संवेदनशील असून संकटकाळी सर्वजण एकत्र येवून लढाई करतात, ही तालुक्याची परंपरा आहे. आजही आणीबाणीची वेळ असून या संकटात तालुक्यातील प्रत्येक माणसाने या महामारीत प्रत्येकाला मदत करा, करोनाकडे अस्पृश्य भावनेने न पहाता त्याला सर्वांनी नियमांचे पालन करुन थोपवा, परतवून लावा. करोनाची अकोल्यातील स्थिती भयावट असून रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन नाही, रेमडीसीवर साठी रुग्णांचे नातेवाईक वण-वण भटकत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. आपल्या जवळच्या अनेक माणसांना करोनाने गाठले अन् आपल्यातून नेलेही. हे सर्व मला मनाला वेदना देणारे आहे. तालुक्यातील प्रत्येक माणूस हा माझा आहे, त्यांची दुख: सुख हे माझ आहे.
चाळीस वर्षांपूर्वीच्या अकोल्यात आदिवासी भागात एखादा आजारी पडला तर त्याला डोली करुन न्याव लागायच. रस्ते - पुल दळण वळणाची साधने नव्हती आज या सर्व सुविधा असून चार मोठी ग्रामीण रुग्णालये, 10 प्राथमिक आरोग्य केंद्र, 80 आरोग्य उपकेंद्र निर्माण केली. हे निर्माण करताना अत्यंत प्रतिकुल परिस्थिती होती पण अकोल्याची जनता जनार्दन माझ्या बरोबर होती. त्यामुळे मोठया आत्मविश्वासाने तालुक्यावर येणाया प्रत्येक संकटाला परतवून लावू शकलो. आयुष्यभर संघर्ष आपल्या वाटयाला आला, परिणामांची चिंता न करता लोकांसाठी काम करीत राहिलो. आजही वयाच्या 80 व्या वर्षी लोकांसाठी काम करण्याची उर्मी ही लोकांमुळेच आपल्याला मिळते. परक्यांबरोबरच स्वकीयांनीही आपल्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला, पण आपण कधीही डगमगलो नाही, घाबरलो नाही. कारण तुम्ही माझ्या सोबत होता, लोक हीच आपली ऊर्जा आहे. घाबरु नका, येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. सकारात्मक विचार करा, खंबीर रहा. विशेष करुन तरुणांनी संयम ठेवा. सोशल मिडियाचा सकारात्मक वापर करा. प्रशासनाने या काळात तटस्थपणे काम करणे अपेक्षित आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून रहावे. हलगर्जीपणा करु नये. जास्तीत जास्त व्हॅक्सीनेशन वर भर दयावा.त्याचे प्रभावी असे नियोजन करा. यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा अपेक्षित आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन रुग्णांना वेगळे ठेवून ही साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करावे. लोकांनीही प्रशासनाला मदत- सहकार्य करणे आवश्यक असून गर्दी करु नये.
आपल्या पातळीवर जवढे शक्य आहे, तेवढे प्रयत्न आपण करीत असून अगस्ति आश्रम येथे अगस्ति साखर कारखान्याच्या माध्यमातून कोवीड सेंटर सुरु केले असून राजूर येथेही वैभवभाऊंनी कोवीड सेंटर सुरु केले आहे. व्यक्तीगत पातळीवरही पिचड कुंटुंबीय रुग्णांना आवश्यक तेवढी मदत करीत असून आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांनसाठी काम करीत राहू. दुर्देवाने ज्यांच्यावर ही जबाबदारी जनतेने टाकली आहे, तेच ऐकमेकांबरोबर भांडत बसले असून आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. ज्यांच्यावर यांचा दबाव असायला हवा ते प्रशासन यांना जुमानत नाही असे चित्र ऐकीकडे असून दूसरीकडे जनता करोना महामारीत होरपळत आहे. करोनाचे राजकारण करु नका जनतेला मदतीचा हात दया.असेही आवाहन करीत आपण राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , आरोग्यमंत्री याना एक पत्रही लिहून कळवले आहे. असेही पिचड म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत