मुंबई : वेबटीम सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात परिणामकारक उपाय आहे. 14 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिम राबवण...
मुंबई : वेबटीम
सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात परिणामकारक उपाय आहे. 14 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. आता 1 मे पासून देशात 18 वर्षाच्यावरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. ही लस घेण्यासाठी देशातील युवकांना नोंदणी करावी लागणार आहे. त्याची माहिती पुढील प्रमाणे-
1.सर्वात आधी www.cowin.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. याठिकाणी तुम्हाला चालू असलेला मोबाइल नंबर टाकावा लागणार आहे. तुमच्या टाकलेल्या त्या रजिस्टर मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी साईटवर टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर होईल. 2. मोबाइल नंबर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही वेबसाईटच्या Registration of Vaccination वर या Web page वर याल. त्याठिकाणी तुम्हाला फोटो आयडी टाइप, फोटो आयडी प्रूफ नंबर टाकावा लागेल. तर ज्याला लस घेयची आहे त्याचं नाव, जन्म दिनांक, लिंग आणि अन्य माहिती भरावी लागेल. 3. सर्व माहिती भरून झाल्यानंतर Register बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर तुमचा रजिस्टर झालेला Beneficiary Reference ID दिला जाईल. तो ID तुम्हाला जपून ठेवायचा आहे. 4.तुम्ही एका वेळी 3 जणांची नोंदणी करता येईल. त्यासाठी Add More बटनवर क्लिक करावं लागेल. ज्याप्रमाणे तुम्ही आधी माहिती भरली होती. तितकीच माहिती तुम्हाला त्यात भरावी लागेल. 5.आपल्या जवळच्या सेंटरला शोधण्यासाठी तुम्हाला www.cowin.gov.in वेबसाईटवर जाऊन खाली बाजूस Scroll करा. त्याठिकाणी मॅप आणि डायलॉग बॉक्सचा पर्याय दिला आहे. तुम्हाला Enter place, Address, Location इत्यादी माहिती भरावी. त्यानंतर Go बटनवर क्लिक करावं. 6. अपॉइंटमेंट शेड्युल करण्यासाठी तुम्हाला Account Detail पेजवर जावं लागेल. तेथे Schedule Appointment वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वॅक्सिनेशन सेंटरचा पर्याय निवडू शकता. 7.यानंतर Book बटनवर क्लिक करा. यानंतर Appointment Confirmation पेज ओपन होईल. भरलेली माहिती पुन्हा वाचून घ्या आणि शेवटी Confirm बटनावर क्लिक करा. त्यानंतर ठरलेल्या वेळी तुम्हा जाऊन लस घेऊ शकता. 8.दुसऱ्या लसीचा डोस घेण्यासाठी 4 ते 6 आठवड्यात तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर संदेश येईल. त्यावेळी पहिला डोस घेतलेल्या ठिकाणी जाऊन दुसरा डोस घेणं आवश्यक आहे. 9.लस घेतल्यानंतर लस सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला cowin.gov.in वर पुन्हा जावं लागेल. यानंतर Vaccination Certificate पर्यायावर जाऊन Beneficiary Reference ID टाकावा लागेल. 10.Get Certificate बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावाचं Certificate मिळेल . या सर्टिफेकट मध्ये नाव, जन्म दिनांक, Beneficiary Reference ID , फोटो ओळखपत्र, लसीचे नाव, हॉस्पिटलचे नाव ही सर्व महिती उपलब्ध असेल.
सर्टिफेकट मिळाल्यानंतर तुमच्याच नावाचं आहे का ते तपासून घ्या. अशा प्रकारे तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि लस सर्टिफिकेशन डाउनलोड करू शकता. पहिला डोस घेतलेल्या दुसराही डोस घेणं आवश्यक आहे. लसीकरण हा सर्वात परिणामकारक उपाय आहे. त्यामुळे कोरोनाला हारवायचं असेल तर लसीकरणात सर्वांनी सहभागी होणं आवश्यक आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत