राजूर : विलास तुपे राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड ,माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर ग्रामपंचायतने लोकवर्गणीतून कोरोना...
राजूर : विलास तुपे
राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड ,माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर ग्रामपंचायतने लोकवर्गणीतून कोरोना काळजी केंद्र सुरू केले असून या केंद्रात 70 रुग्ण उपचार घेत आहेत. व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते यांनी केंद्राला भरभरून मदत केली आहे .किराणा, रोख रक्कम, भाजीपाला मिळालाच मात्र आज मुंबई येथील उद्योजक राजेन्द्र, विजेंद्र व रवी पवार या तीन बंधूंनी दीड लाखाचे औषध कमिटीकडे सुपूर्त केले.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ दिघे,सरपंच गणपत देशमुख,पोलिस अधिकारी नितीन खैरनार,भास्कर य लमामे. कैलास येलमामे,संतोष मृत डक,ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नाडेकर ,तलाठी ज्ञानदेव बांबळे,विजय पवार,बाळासाहेब देशमुख,काशिनाथ भडांगे,श्रीराम पन्हाळे,नितीन चोथवे ,जेष्ठ पत्रकार शांताराम काळे,विलास तुपे दर्शन ओहा रा,अक्षय देशमुख उपस्थित होते .तर राजेंद्र पवार कुटुंबियांच्या वतीने त्यांच्या मातोश्री सीताबाई मारुती पवार त्यांच्या भगिनी यशोदाबाई सौ.सोनवणे ताई,डॉ .सौ.लंके यांनी दीड लाखाचे औषधे ग्रामपंचायत राजूर व स्थानिक कमिटी कडे दिले . तर स्थानिक किरण सोनवणे पाच हजार रुपये रोख दिले त्यामुळे या केंद्राला ग्रामस्थांनी मोठी मदत दिल्याने समाधान व्यक्त होत आहे .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत