नगर : प्रतिनिधी जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधित राखणाऱ्या जिल्हा पोलिस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांनी पोलीस प्रशासनाला मोठी शि...
नगर : प्रतिनिधी
जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधित राखणाऱ्या जिल्हा पोलिस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांनी पोलीस प्रशासनाला मोठी शिस्त लावली आहे. मात्र, शेवगाव ऑक्सिजन गाडी रोखल्याप्रकरणात त्यांनी काय भूमिका घेतली, हे जाणून घेण्यासाठी 'जनतेचा आवाज' कानावर पडताना दिसत आहे. मात्र, हाच आवाज पोलीस अधिक्षकांपर्यंत पोहचेल का ? याकडे लक्ष लागले आहे.पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्याचा पदभार घेतल्यापासून त्यांनी कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे. या कालावधीत त्यांनी गुन्हेगारांवर अंकुश आणतानाच प्रशासनात देखील आपला वचक निर्माण केला आहे.
किराणा, भाजीपाला व फळ विक्रेत्या व्यावसायिकांनी नियमाचे उल्लंगन केल्यास रितसर कारवाई करुन दंड करावा. मात्र पोलीसांनी त्यांचे साहीत्य,सामान फेकून देवून दमदाटी व मारहाण करु नये.( वजीर पठाण - सचिव - शेवगाव तालुका किराणा व्यापार असोसिएशन ) .........................
पोलीस प्रशासन ,आरोग्य विभाग, दुकानदार, अत्यावश्यक सेवा देणा-या संस्थांना लक्ष्य करुन कारवाईची भिती दाखवत आहेत. तसेच कोरोना काळात सुरु असलेले अवैध धंदे बंद करावेत. आँक्सीजन सिलेंडर दोन दिवस पोलीस ठाण्यात लावून आरोग्याशी खेळणा-या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी. ( अरुण मुंढे - जिल्हाध्यक्ष भाजप ) ..........................
,
कोरोना महामारीच्या या कालावधीत संपूर्ण राज्यात आँक्सीजनचा प्रचंड तुटवडा होता. पोलीसांनी आँक्सीजन सिलेंडरचे वाहन दिवस पोलीस ठाण्यात अडवून ठेवले. याच दरम्यान जर एखादया रुग्णाचा आँक्सीजन अभावी जीव गेला असता तर त्यास जबाबदार कोण राहीले असते ? त्याच प्रमाणे शासनाने घातलेल्या कडक निर्बंधाची अमलबजावणी करतांना पोलीस किराणा, भाजीपाला, फळ विक्रेत्यांनाही विनाकारण दमदाटी करुन त्यांची अडवणूक करत आहेत. तसेच या प्रकरणाची वर्तमानपत्रात बातम्या प्रसिध्द करणा-या बातमीदारांना दमदाटी करणा-या पोलीस अधिका-यांवर त्वरीत कारवाई करावी ( कैलास बुधवंत, अध्यक्ष - शेवगाव तालुका पत्रकार संघ )............................................ कोपरगाव शहरचे पोलीस अधिकारी हर्षवर्धन गवळी, पाथर्डी- रणजित डेरे , अकोलेच्या अभय परमार, संगमनेरचे मुकुंद देशमुख यांच्या तडकाफडकी बदल्यावरून मनोज पाटील यांच्याकडे चुकीला माफी नसल्याचेच दिसून आले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र शेवगाव येथे ऑक्सिजनची गाडी पोलिसांनी रोखून ठेवल्याप्रकरणीं सत्यता त्यांनी तपासून पाहिली का ? पोलीस अधिकाऱ्यांनी दोन दिवस ऑक्सिजन गाडी रोखून ठेवण्याची गरज होती का ?, त्या वाहन चालककडे ऑक्सिजन वाहतुकबाबत परवानगी नव्हती का ? याबाबत शहानिशा होण्याची गरज आहे. किमान याबाबत चौकशी करण्याची तसदी त्यांनी घ्यावी, असा जनतेचा सूर आहे, तसेच यात अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करावी व तेथे नव्या अधिकाऱ्याला संधी द्यावी, असाही सूर आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत