'त्या' आमदारांचा आदर्श घ्या ; ना.तनपुरे, आ.लहामटेवर भाजप कार्यकर्त्यांचा निशाणा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'त्या' आमदारांचा आदर्श घ्या ; ना.तनपुरे, आ.लहामटेवर भाजप कार्यकर्त्यांचा निशाणा

 राहुरी : प्रतिनिधी                सध्या कोव्हिडं सेंटर उदघाटनापासून ते रेमडेसीविर इंजेक्शन वाटप, कोरोना लस देताना शुभारंभ आणि आता रुग्णवाह...

 राहुरी : प्रतिनिधी       


       
सध्या कोव्हिडं सेंटर उदघाटनापासून ते रेमडेसीविर इंजेक्शन वाटप, कोरोना लस देताना शुभारंभ आणि आता रुग्णवाहिका लोकापर्ण करतानाही फोटो सेशनद्वारे काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीची एकही संधी सोडत नाहीत. तर दुसरीकडे डहाणूचे आ.विनोद निकोले यांनी रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये लावून कुठलीही प्रसिद्धी केली नसल्याने हा एक आदर्श मानला जात आहे.  मात्र नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे राहुरीचे लोकप्रतिनिधी ना.प्राजक्त तनपुरे व अकोलेचे आमदार किरण लहामटे यांनी रुग्णवाहिका लोकापर्ण करताना फोटोशेशन व जोरदार मिडियाबाजी केल्याने काही भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर याबाबत फोटोसह मोठी खिल्ली उडवली आहे.                                       
               
भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फिरवलेला हाच तो फोटो, आज जिल्ह्यात मोठा चर्चेचा विषय बनला आहे
                                                         राज्यात कोरोना रुग्णांची संखया दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजन बेड रेमडेसिवर आदीची उपलब्धता होत नसल्याने सर्वत्र भयावह परिस्थिती आहे.राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी स्वतःच्या मतदारसंघात रुग्णवाहिका लोकार्पण करत आहे. राहूरीचे लोकप्रतिनिधी तथा ना.प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी राहूरी तहसिल कार्यालया आवारात एक रुग्णवाहिका अर्पण करण्यात आली. या रुग्णवाहिकेवर ना.तनपुरे यांचा मोठा फोटोही झळकत होता. फोटोशेशन व मिडियाबाजी करत हा छोटखानी लोकार्पण सोहळा संपन्न झाला. अशीच परिस्थिती अकोलेत पहावयास मिळाली. आ.किरण लहामटे यांनी मतदारसंघासाठी दिलेल्या रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमात जोरदार फोटोबाजी करण्यात आली. रुग्णवाहिकेवरील आमदार लहामटे यांचा दिमाखदार फोटोही चांगला चमकत होता.

 दरम्यान दुसरीकडे डहाणुचे आमदार विनोद निकोले यांनी रुग्णवाहिका आणून दिली व दवाखान्यासमोर लावून दिली.कसला फोटो नाही अन मिडियाबाजी केली नाही. विशेष म्हणजे त्यांनी रुग्णवाहिकेवर स्वतःचे नाव टाकले ते शोधून सापडावे लागते अशी स्थिती होती.

  दरम्यान ना.तनपुरे व आ.लहामटे यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून वाह.. वा केली. आपल्या लोकांनी  लीड मोजण्याची संधी दिली आता फक्त दादांच्या कामाचा स्पीड मोजत रहा, कर्तव्य आहे, माय-बाप जनतेच्या सेवेच असा स्लोग्न टाकून बडेजाव करत आहे. 

  राहूरी तालुक्यात कोरोना रूग्णांची सँख्या वाढत असल्यानं ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन युक्त कोविड सेंटर उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.                                                                                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत