औरंगाबाद : वेबटीम कुटुंबातील सर्वात लाडक्या मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसल्याने आई-वडिलांनीही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घ...
औरंगाबाद : वेबटीम
कुटुंबातील सर्वात लाडक्या मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसल्याने आई-वडिलांनीही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना पुणे येथे घडली आहे. दरम्यान, प्ररसिद्ध डॉ.संजय नवले यांच्या पाठोपाठ आई- वडिलांचेही निधन झाल्याची घटना अत्यंत वेदनादायक आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ.संजय माणिकराव नवले (वय ५५) यांचे १५ एप्रिल रोजी उपचार सुरु असतांना औरंगाबादेत निधन झाले. मुळचे चोराखळी (ता.कळंब, जि.उस्मानाबाद) येथील ते रहिवाशी होते. त्यांच्यावर त्याच दिवशी ऊस्मानाबादेत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारास उपस्थित असलेल्या वयोवृद्ध आई-वडिलांना लाडक्या मुलाच्या मृत्यूने मोठा धक्का बसला. अचानक रक्तदाब कमी झाल्याने त्यांना पुण्यातील बोरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच माणिकराव तात्याबा नवले ( माजी शिक्षण अधिकारी, ८०) यांचे शुक्रवारी (दि.२३) सायकांळी ५ वाजता निधन झाले. तर दोन तासातच पत्नी मंदाकिनी माणिकराव नवले ( ७८) यांनीही प्राण सोडला. पुत्रवियोगाचा धक्का बसल्याने अंथरुणाला खिळलेल्या या दोघांचीही प्राणज्योत मालवली. या दांपत्यावर आज सकाळी धनकवडी, पुणे येथील महानगरपालिकेच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात प्रा.अरविंद (शिवाजी महाविद्यालय, उदगीर) व सुनील (पुणे) ही दोन मुले, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचे वृत्त समजताच चोराखळी गावावर शोककळा पसरली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत